ETV Bharat / state

भाजप पक्ष आता काँग्रेस विचारांचा भाजप झाला आहे -ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

author img

By

Published : Jul 9, 2021, 9:40 PM IST

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचे जवळचे आहेत. फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडील सूक्ष्म व लघु उद्योग खाते हे राणे यांना द्यायला लावले. प्रीतम मुंडे यांना मंत्री करण्याचे जाहीर झाले होते. मात्र, त्याठिकाणी डॉ. भागवत कराड यांची वर्णी लागली. मुंडे यांचे कार्यकर्ते असणारे डॉ. कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्री निवड करण्याचे काम देवेंद्र फडणवीस यांचेच आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

ग्राविकास मंत्री हसन मुश्रिफ
ग्राविकास मंत्री हसन मुश्रिफ

कोल्हापूर - भाजपमध्ये इतर पक्षांच्या नेत्यांची आयात झाल्यामुळे भाजप मूळ विचारांचा पक्ष राहिलेला नाही. तो काँग्रेस विचारांचा भाजप झालेला आहे. असा टोला लगावत केंद्र सरकारने नव्याने स्थापन केलेल्या सहकार खात्यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.राज्यघटनेप्रमाणे केंद्राला राज्यातील सहकार क्षेत्रात कोणताही हस्तक्षेप करता येणार नाही. हे खाते तयार झाल्याने मल्टीस्टेट संस्थांवर केंद्राचे नियंत्रण येईल, असे म्हणत केंद्र सरकारच्या या निर्णयाने चांगलेच झाले आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मिश्रीफ

डॉ. कराड यांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री करण्याचे काम फडणवीसांचे

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांचे जवळचे आहेत. हे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निवडीवरून सिद्ध झाले. फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्याकडे असलेले सूक्ष्म व लघु उद्योग खाते हे नारायण राणे यांना द्यायला लावले. प्रीतम मुंडे यांना मंत्री करण्याचे जाहीर झाले होते. मात्र, त्याठिकाणी डॉ. भागवत कराड यांची वर्णी लागली. मुंडे यांचे कार्यकर्ते असणारे डॉ. कराड यांची केंद्रीय अर्थ राज्यमंत्री निवड करण्याचे काम हे देवेंद्र फडणवीस यांचेच आहे. तसेच, खासदार हिना गावित यांना मंत्री पद मिळणे अपेक्षित होते. मात्र, त्याठिकाणी डॉ. भारती पवार यांना मंत्री पद देण्याचे काम फडणवीस यांनी केले, यावरूनच फडणवीस यांचा केंद्रात मोठा वरचष्मा दिसतो असही मुश्रीफ म्हणाले आहेत.

काँग्रेस विचारांचा भाजप

भारतीय जनता पार्टीने सत्तेत आल्यानंतर सर्व पक्षातील माणसांना आयात केले. त्यामुळे भाजप हा मूळ विचारांचा पक्ष राहिलेला नाही. तो काँग्रेस विचारांचा भाजप झालेला आहे. असा टोला मुश्रीफ यांनी लगावला आहे. राज्यघटनेप्रमाणे सहकार क्षेत्र हा राज्याचा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी अधिनियम प्रमाणे संस्था नोंदणी झाली असेल, तर केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच येत नाही. केंद्र सरकारने मल्टीस्टेट संस्था यांच्यावर कडक अभिप्राय करावेत. घटनेप्रमाणे राज्यातील सहकार क्षेत्रात केंद्र सरकारला कोणताही हस्तक्षेप करता येणार नाही. त्याचा परिणाम राज्यातील सहकार क्षेत्रावर होणार नाही. केंद्र सरकारने नव्याने स्थापन केलेल्या सहकार खात्याबद्दल चांगली भूमिका घेत, या निर्णयामुळे मल्टीस्टेट संस्थांवर नियंत्रण येईल, अशी प्रतिक्रिया मुश्रीफ यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.