कोल्हापूर - आंबेवाडी आणि चिखली या दोन गावांमध्ये जवळपास पाच ते सहा दिवस कोस्टगार्डच्या जवानांनी सतत बचाव कार्य केले. जवानांनी हजारो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले. संकटात सापडलेल्या नागिरकांना जवानांनी जीवनदान दिल्याने जणू ते 'देवदूत'च ठरले. पूरस्थिती नियंत्रणात आल्याने जवानांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. त्यामुळे त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला.
या देवदूतांनी अर्थातच कोसगावच्या जवानांनी मंगळवारी अंबाबाईचे दर्शन घेतले. पूरग्रस्त भागातील नागरिकांना सुखात, समाधानात आणि आनंदात ठेव, अशी प्रार्थना या जवानांनी अंबाबाईकडे केली.