कोल्हापूर - तंटामुक्त अध्यक्षाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना चंदगड तालुक्यातील उमगाव येथे घडली. ही धक्कादायक घटना आज मंगळवारी घडली. शिवाजी गावडे, असे आत्महत्या करणाऱ्या तंटामुक्त अध्यक्षाचे नाव असून विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे समजले आहे.
शिवाजी गावडे यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांच्या नातेवाईकांनी नकार दिला आहे. या घटनेमुळे चंदगड शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून परिस्थिती बघता चंदगडमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर, आत्महत्येस प्रवृत्त करणार्यांना अटक करा, अशी मागणी मृत शिवाजी यांच्या नातेवाईकांनी केली असून थोड्याच वेळात त्यांचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोर आणला जाणार आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यासमोर नागरिकांनी प्रचंड गर्दी केली.
हेही वाचा- महाविकास आघाडीने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी - चंद्रकांत पाटील