कोल्हापूर - जिल्ह्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुध आंदोनल पुकारले आहे. या आंदोलनाची पहिली ठिणगी राधानगरी तालुक्यातील बिद्री टिटवे गावात पडली. संघटनेचे कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन गोकुळ दूध संघाकडे घेऊन जाणार्या गाड्या आडवून गाड्यांमधील दूध रस्त्यावर ओतून दिले.
संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत, खरेदी दरात वाढ मिळावी, अशी घोषणाबाजीही केली. तसेच ग्रामीण भागातून गोकुळ शिरगावकडे जाणारे दूध रोखून ते हजारो लिटर दूध रस्त्यावर उतरून दिले. याबरोबरच शिरोळ तालुक्यातील नांदणी या ठिकाणी ग्रामदैवत भैरवनाथाला दुग्धाभिषेक घालून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी या आंदोलनाची हाक दिली होती. शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.