कोल्हापूर - मराठा समाजाचा पक्ष, अशी ओळख असलेल्या महाराष्ट्र क्रांती सेनेच्या वतीने आज कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदार संघासाठी महाराष्ट्र क्रांती सेनेचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पाटील यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी उपस्थित महाराष्ट्र क्रांती सेनेच्या कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठा, अशा घोषणा दिल्या.
मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र क्रांती सेना कार्यरत असून राजू शेट्टी आणि धैर्यशील माने या दोन्ही उमेदवारांना आता हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये सुरेश पाटील यांचे आव्हान असणार आहे.