ETV Bharat / state

गोकुळ निवडणूक : पहिल्याच दिवशी 7 जणांनी एकूण 12 उमेदवारी अर्ज केले दाखल

author img

By

Published : Mar 25, 2021, 6:37 PM IST

गोकुळच्या निवडणूक कार्यक्रमास सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या सचिवांनी मान्यता दिल्यानंतर निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाली आहे. 20 एप्रिल पर्यंत माघारीची मुदत आहे. 2 मे रोजी मतदान तर 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

कोल्हापूर
कोल्हापूर

कोल्हापूर - पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दूध संघाची म्हणजेच 'गोकुळ'ची पंचवार्षिक निवडणूक पार पडत आहे. आज पहिल्याच दिवशी 7 जणांनी एकूण 12 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. 1 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत, अशी महिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.

सत्तारुढ गटासमोर पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी मिळून जाहीर केलेल्या राजर्षी शाहू आघाडीने मोठे आव्हान निर्माण केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गोकुळवर आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सत्ता आहे. गेल्या वेळच्या पंचवार्षिक निवडणुकीत सतेज पाटील यांनी अनेकांचा पाठिंबा नसून सुद्धा सत्तारुढ गटाला टक्कर दिली होती. मात्र, आता सत्तारुढ गटातील अनेक संचालक फुटून विरोधी बाकावर आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत अधिकच रंगत आली असून आता हालचालींना वेग आला आहे. सर्वांनीच एकमेकांच्या गाठीभेटी घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत काय होणार हे पाहणे रंजक ठरणार आहे.

आज उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची नाव पुढीलप्रमाणे :

  • 1) बाबाजी उर्फ विश्वासराव नारायण पाटील (सर्वसाधारण)
  • 2) अरुण गणपतराव डोंगळे (सर्वसाधारण)
  • 3) शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर (सर्वसाधारण)
  • 4) अजित शशिकांत नरके (सर्वसाधारण)
  • 5) बाबाजी उर्फ विश्वासराव नारायण पाटील (इतर मागासवर्गीय)
  • 6 ) बाबाजी उर्फ विश्वासराव नारायण पाटील (सर्वसाधारण)
  • 7) बाबाजी उर्फ विश्वासराव नारायण पाटील (इतर मागासवर्गीय)
  • 8) महाबळेश्वर शंकर चौगुले(सर्वसाधारण)
  • 9) बाळासो उर्फ वसंत नानु खाडे (सर्वसाधारण)
  • 10)बाबासाहेब श्रीपती चौगले (सर्वसाधारण)
  • 11) बाबासाहेब श्रीपती चौगले (सर्वसाधारण)
  • 12) महाबळेश्वर शंकर चौगुले (सर्वसाधारण)

    यामध्ये 7 जणांनी एकूण 12 उमेदवारी अर्ज आज पहिल्याच दिवशी दाखल केले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.