ETV Bharat / state

सीमावादानंतर कर्नाटकची बससेवा सुरु तर महाराष्ट्राचे भिजत घोंगडे - महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद लेटेस्ट न्यूज

गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये सीमावाद सुरू आहे. अनेकवेळा हा सीमावाद उफाळून येतो. आठवडाभरापूर्वी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव जिल्ह्याचे शिवसेना अध्यक्ष प्रकाश जारकीहोळ यांच्या गाडीवर हल्ला केला होता. त्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला.

ST
एसटी
author img

By

Published : Mar 18, 2021, 12:29 PM IST

Updated : Mar 18, 2021, 2:10 PM IST

कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादानंतर दोन्ही राज्यातील एसटी वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र, कर्नाटक सरकारने या वादाला भीक न घालता एसटीची वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकार महाराष्ट्र राज्यातील प्रवासी पळवून नेत असताना महाराष्ट्र राज्य सरकारने अद्याप फक्त बघ्याची भूमिका घेतली आहे. कोरोना काळात उत्पन्न बुडाले असताना आर्थिक तूट कशी भरून काढणार?असा प्रश्न एसटी समोर आहे. असे असताना आपण एसटी सेवा बंद केली आहे आणि कर्नाटक मात्र, आपल्या प्रवाशांचा वापर करून पैसा मिळवत आहे. त्यामुळे एकतर कर्नाटकची बससेवा बंद करावी किंवा महाराष्ट्र सरकारने एसटी महामंडळाला कर्नाटकात बससेवा सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.

महाराष्ट्र सरकारने एसटी महामंडळाला कर्नाटकात बससेवा सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे

काय आहे प्रकरण -

आठवडाभरापूर्वी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव जिल्ह्याचे शिवसेना अध्यक्ष प्रकाश जारकीहोळ यांच्या गाडीवर हल्ला केला होता. त्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला होता. त्याला कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेने प्रत्युत्तर देत कर्नाटक राज्याची बससेवा रोखली होती. दोन्ही राज्यातील संतापाची लाट पाहता दोन्ही राज्यातील एसटी बस सेवा बंद ठेवण्यात आली होती. असे असतानाही कर्नाटकातील एका व्यक्तीने कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक परिसरात येऊन एसटीवर दगडफेक केली. त्यामुळे वातावरण चिघळल्याने पुढील दोन दिवस दोन्ही राज्यातील बससेवा बंद होती. अद्याप महाराष्ट्र राज्यातील एसटी महामंडळाने कर्नाटकात प्रवासाला परवानगी दिली नाही. मात्र, कर्नाटक सरकारने त्यांच्या एसटीला महाराष्ट्रात प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे कर्नाटकची एसटी महाराष्ट्राचे प्रवासी पळवत आहेत. त्याचा फटका अप्रत्यक्षपणे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला बसत आहे.

कर्नाटक बसला स्थानकात प्रवेश नाही -

महाराष्ट्र-कर्नाटक वादानंतर बंद करण्यात आलेली बससेवा कर्नाटकने पुन्हा सुरू केली आहे. मात्र, कर्नाटकच्या कोणत्याही बसला महाराष्ट्र राज्यातील स्थानकात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे स्थानकाबाहेर उभे राहून वाहतुकीला अडथळा करण्याचे काम कर्नाटकची बससेवा करत आहे. शिवाय कर्नाटकचे कर्मचारी प्रवाशांना अक्षरशः ओढून नेत आहेत. हे सुरू असताना मात्र, राज्य परिवहन महामंडळ केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. स्थानिक विभागीय मंडळाने याबाबत पाठपुरावा करून कर्नाटकात प्रवासाला परवानगी द्यावी, अशी मागणी होत आहे.

हेही वाचा - शिरवळ-लोणंद शहरात दिवसातून दोन वेळा संचारबंदी; प्रशासनाचे प्रतिबंधात्मक पाऊल

Last Updated : Mar 18, 2021, 2:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.