ETV Bharat / state

ईटीव्ही भारत विशेष : तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. मात्र आता तिसऱ्या टप्प्याला नागरिकांमधून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या दोन दिवसांमध्येच जिल्ह्यात अडीच हजारांहून अधिक नागरिकांनी लस घेतली आहे.

तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

author img

By

Published : Mar 5, 2021, 3:56 AM IST

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. मात्र आता तिसऱ्या टप्प्याला नागरिकांमधून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या दोन दिवसांमध्येच जिल्ह्यात अडीच हजारांहून अधिक नागरिकांनी लस घेतली आहे. तिसऱ्या टप्प्यात 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिक आणि 45 ते 60 वयोगटातील व्याधीग्रस्त नागरिकांना लस देण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण 120 ठिकाणी लसीकरण सुरू आहे. त्याला नागरिकांमधून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक सुनील माळी यांनी म्हंटले आहे.

लसीकरण आणि प्रशासनाचे उत्तम नियोजन

पहिल्या दोन टप्प्यांमध्ये लसीकरणाबाबत फारसा उत्साह पाहायला मिळाला नाही. तिसऱ्या टप्प्यात मात्र पहिल्याच दिवसापासून नागरिक स्वतःहून पुढे येऊन लस घेत आहेत. विशेष म्हणजे प्रशासनाकडून सुद्धा लसीकरणाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जवळपास शहरासह जिल्ह्यातील 120 सरकारी केंद्रांवर लसीकरण मोहीम पार पडत आहे. याचे नेटकं नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले असल्याने नागरिकांमधून सुद्धा समाधान व्यक्त होत आहे. शहरात उत्तम सोय तर आहेच शिवाय गावोगावी सुद्धा जेष्ठांना आरोग्य केंद्रांपर्यंत नेण्यासाठी सोय करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर मास्क, सॅनिटायझर बरोबरच निरीक्षण कक्ष सुद्धा बनवण्यात आला आहेत. त्यामुळेच चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे. मिळालेला प्रतिसाद पाहता तिसऱ्या टप्प्यात जास्तीत जास्त नागरिक लस घेतील असा प्रशासनाला विश्वास आहे.

तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

तिसऱ्या टप्प्यात 'इतके' लाभार्थी :

कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी डॉक्टर नर्स आदींना लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यामध्ये फ्रन्टलाइन वर्कर्सचा समावेश होता. आता तिसऱ्या टप्प्यामध्ये 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि 45 ते 60 वयोगटांमधील व्याधिग्रस्त नागरिकांचा समावेश करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 5 लाख 90 हजार ज्येष्ठ नागरिक तसेच 1 लाख 52 हजार व्याधिग्रस्त नागरिक आहेत. त्यापैकी अडीच हजारांहून अधिक नागरिकांनी आत्तापर्यंत लस घेतली आहे.

लसीकरणाची तयारी
लसीकरणाची तयारी

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात असा मिळाला प्रतिसाद

पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी डॉक्टर नर्स आदींना लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यामध्ये फ्रन्टलाइन वर्कर्सचा समावेश होता. यामध्ये पहिल्या टप्प्यात 34 हजार 960 जणांनी नोंदणी केली होती. मात्र प्रत्यक्षात केवळ 27 हजार 941 जणांनी लस घेतली आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात 29 हजार 821 लोकांनी नोंदणी केली होती. त्यातील 9 हजार 899 लोकांनी लस घेतली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात 80 टक्के लसीकरण झाले मात्र दुसऱ्या टप्प्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.

सेल्फी पॉईंट
सेल्फी पॉईंट

सेल्फी पॉईंट

लसीकरणाबाबत जनजागृतीसाठी प्रशासनाकडून वारंवार सांगितलं जात आहेच, मात्र आता लसीकरणाच्या ठिकाणी सेल्फी पॉईंट बसवण्यात आले आहेत. ज्यांनी लस घेतली, त्यांनी इतरांना देखील लस घेण्याचे आवाहन करावे यासाठी हे सेल्फी पॉंईट बसवण्यात आले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.