ETV Bharat / state

'ईटीव्ही भारत' विशेष : जि.प.च्या दिव्यांग शाळांमध्ये दीपावलीचे साहित्य बनविण्याची लगबग

यंदाच्या गिफ्ट पॅकमध्ये साबण-तेलांसोबतच सॅनिटायझरच्या बाटलीचाही समावेश झाला आहे. बनवलेल्या वस्तू, स्पेशल ऑलिम्पिक, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सहभाग पाहून पंखाविना भरारी काय असते, ते या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे.

special students making deewali sahitya kolhapur
दिव्यांग शाळांमधील दिपावलीचे साहित्य बनविण्याची लगबग
author img

By

Published : Nov 9, 2020, 4:16 PM IST

Updated : Nov 9, 2020, 4:50 PM IST

कोल्हापूर - जिल्हा परिषदेच्या मान्यताप्राप्त दिव्यांग आणि गतिमंद मुलांच्या शाळांमध्ये दिवाळीसाठी आकर्षक आकाश कंदिल, रंगीबेरंगी पणत्या, उटणे, मेणबत्त्या यांच्यासह भेटवस्तू तयार करण्यात गुंतली आहेत. यंदाच्या गिफ्ट पॅकमध्ये साबण-तेलांसोबतच सॅनिटायझरच्या बाटलीचाही समावेश झाला आहे. बनवलेल्या वस्तू, स्पेशल ऑलिम्पिक, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील सहभाग पाहून पंखाविना भरारी काय असते, ते या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. पाहुयात, 'ईटीव्ही भारत'च्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शाळा आणि त्या ठिकाणी दीपावलीचे साहित्य बनविण्याची सुरू असलेली लगबग...

'ईटीव्ही भारत' विशेष : कोल्हापूरातील दिवाळी...

चेतना विकास मंदिर - विद्यार्थ्यांचे वर्क फ्रॉम होम

चेतना विकास मंदिरात कागदाच्या लगद्यापासून इको फ्रेंडली गणेश मूर्ती बनवल्या जातात. याठिकाणी तेलाचा घाणा सुरू आहे. दरवर्षी, या एका केंद्राद्वारे 50 हजार पणत्या, 12 हजार आकाश कंदिल, 5 हजार लक्ष्‍मीपूजनासाठी डबाबंद सामग्रीची दिवाळीच्या निमित्ताने विक्री होते. यामधून 15 लाखांपर्यंतची उलाढाल होत असते. मात्र, यावर्षी लॉकडाऊनमुळे दिवाळीचे साहित्य मुलांकडून घरातून करून घेतले आहे. आतापर्यंत घरातून 25 हजार पणत्या रंगवून आलेल्या आहेत. तसेच जवळपास अडीच हजार आकाश कंदिल तयार करून घेण्यात आलेले आहेत. विशेष म्हणजे, यावेळच्या गिफ्ट बॉक्समध्ये सॅनिटायझरच्या बाटलीचाही समावेश करण्यात आला आहे.

स्वयंम मतिमंद शाळा - विद्यार्थ्यांच्या पेंटिंग्जचे प्रदर्शन

इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित स्वयंम मतिमंद शाळेतील उद्योग केंद्राच्या अध्यक्ष शोभा तावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या शाळेतील उद्योग केंद्रात 18 वर्षांपुढील 56 मुले आहेत. याठिकाणी अत्यंत सुंदर पद्धतीने गणेश मूर्ती आणि वेगवेगळी फुले तयार केली जातात. यावेळी दिवाळीसाठी उपयोगी असणाऱ्या वस्तूंचे बॉक्स तयार करण्यात येत आहे. याठिकाणी फाइल तयार करण्यात येत आहेत. शिवाय पेंटींगचे प्रदर्शनही भरवण्यात येत असते. दुर्लक्षित असणाऱ्या या मुलांना आमच्या संस्थेमार्फत सक्षम करण्यात येते. त्यामुळे या वस्तूंची खरेदी करावी, असे आवाहनही शोभा तावडे यांनी केले आहे.

जिज्ञासा विकास मंदिर - मुलांना सतत कार्यरत ठेवलं जातं

बौध्दिक अक्षम मुलांच्या शाळेत अत्यंत आकर्षक आकाश कंदिलाची निर्मिती होत आहे. या शाळेच्या स्मिता दीक्षित म्हणाल्या, मेणपणत्या मुले सुंदर रंगवतात. वजनानुसार उटण्याचे पॅकिंग करतात. शिवण विभाग, पाक विभागातही या मुलांना वेगवेगळ्या पद्धतीचे प्रशिक्षण दिले जाते. मुलांसाठी व्यायामशाळा देखील आहे. मुलांना सतत कार्यरत ठेवले जाते.

हेही वाचा - फटाकेमुक्त दिवाळी करण्याचे गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आवाहन

सन्मती विकास केंद्र, इचलकरंजी - विद्यार्थ्यांना रोजगार

इचलकरंजी येथील सन्मती मतिमंद विकास केंद्राचे अधीक्षक किशोरी शेडबाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन्मती केंद्रामध्ये लिफाफे तयार करणे, बुके तयार करणे, बॉक्स फाइल तयार करणे, पणत्या रंगवणे, गिफ्ट बॉक्स, लक्ष्मीपूजनचा पुडा, रंगीबेरंगी पणत्या आदींचे प्रशिक्षण दिले जाते. शाळेमार्फत काही विद्यार्थ्यांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे.

गणपतराव गाताडे मतिमंद विद्यालय, कागल - मुलांच्या क्षमतेप्रमाणे प्रशिक्षण

मुलांच्या क्षमतेप्रमाणे येथील विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षणाचे काम दिले जाते. एकूण 25 विद्यार्थी शाळेत शिकत आहेत. वेगवेगळ्या सणानिमित्त साहित्य निर्मिती केली जाते. रक्षाबंधनला राख्या तयार केल्या जातात. दिवाळी सणासाठी आकाश कंदिल, पणत्या, नक्षीदार मेणपणत्या, सुंदर फुले सध्या तयार करण्यात येत आहेत. मतिमंद मुलेदेखील उत्तम पद्धतीने काम करतात हे त्यांच्या वस्तू निर्मितीमधून स्पष्ट झाले आहे. यामधून त्यांना विद्यावेतन मिळते, अशी माहिती येथील तृप्ती गायकवाड यांनी माहिती दिली.

दरवर्षी लाखोंची उलाढाल -

या सर्वच शाळांमध्ये दररोज विविध साहित्य बनविण्याचे काम सुरू असते. शिवाय प्रत्येक सणावेळी त्या त्या वेळी लागणारे साहित्य बनविले जाते. विशेष म्हणजे, दरवर्षी कागदी लगद्यापासून गणेश मूर्तीसुद्धा बनविल्या जातात. याद्वारे जवळपास 50 लाखांपर्यंतची उलाढाल होत असते.

'त्यांच्या' पंखांना बळ देण्याची गरज -

सामान्य मुलांप्रमाणेच ही विशेष मुले खूपच आकर्षक पद्धतीने वस्तू बनवत असतात. त्या सर्वांना या कामाची गोडी लागली आहे. त्यांच्या या वस्तू खरेदी करणाऱ्यांची संख्या खूप आहे. मात्र, यापेक्षाही चांगल्या पद्धतीने त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे. या मुलांच्या सुंदर कलाकृती खरेदी करून आपल्या दिवाळीबरोबरच या मुलांच्या दिवाळीचा आनंदही द्विगुणीत करावा, असे येथील अधीक्षकांनी म्हटले आहे.

क्रीडा क्षेत्रात सुद्धा चमक -

या सर्वच शाळांमधील विद्यार्थी हे आकर्षक वस्तू बनविण्यामध्ये कुशल आहेतच. मात्र, त्याबरोबरच क्रीडा क्षेत्रातसुद्धा अनेकांनी नाव कमावले आहे. यामध्ये प्रामुख्याने अमित सुतार, केदार देसाई, आशिष सावेकर, ओंकार राणे आणि प्राजक्ता पाटील या खेळाडूंनी स्पेशल ऑलिम्पिक आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला आहे.

Last Updated : Nov 9, 2020, 4:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.