कोल्हापूर- वडणगे गावात दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त दोन दिवसीय यात्रा भरते. आज आणि उद्या ही यात्रा असणार आहे. शंकर आणि पार्वतीची दोन वेगवेगळी मंदिरे या ठिकाणी आहेत. या यात्रेसाठी परिसरातील भाविक मोठ्या संखेने हजेरी लावतात.
हेही वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर; पंतप्रधान मोदी व सोनिया गांधींची घेणार भेट
जेव्हा शंकर पार्वती करवीर भ्रमणासाठी या गावात आले होते. तेव्हा तिसरा प्रहर झाल्याने कोंबडा आरवला. त्यामुळे या गावाचा 'करवीर काशी' असा उल्लेख असल्याची आख्यायिका आहे. त्यामुळे महाशिवरात्रीदिवशी येथे कोंबड्याच्या प्रतिकृतीची पूजा करण्यात येते.