ETV Bharat / state

'शासन आपल्या दारी' कार्यक्रम यशस्वी झाल्याने अनेकांच्या पोटात दुखतंय - खासदार श्रीकांत शिंदे - Shasan Aplya Dari Yojana

Shrikant Shinde On Shasan Aplya Dari : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्य शासनाच्या योजना राज्यातील जनतेच्या घराघरात आणि मना-मनापर्यंत घेऊन जात आहेत. यामुळं अनेकांच्या पोटात दुखत आहे. याच योजनेच्या धर्तीवर पंजाब सरकारनंही अशी योजना तिथं सुरू केली आहे. हेच या योजनेचं यश असल्याचं मत खासदार श्रीकांत शिंदे कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केलंय.

Shrikant Shinde
खासदार श्रीकांत शिंदे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 8, 2024, 5:22 PM IST

प्रतिक्रिया देताना खासदार श्रीकांत शिंदे

कोल्हापूर Shrikant Shinde On Shasan Aplya Dari : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी 'शासन आपल्या दारी' ( Shasan Aplya Dari Yojana) कार्यक्रमाची श्वेतपत्रिका काढा अशी मागणी केली आहे. रायगड जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात अनेक कंत्राटदारांकडून कार्यक्रमासाठी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा आरोपही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे. याबाबत विचारलं असता श्रीकांत शिंदे म्हणाले की, राज्य शासनाच्या योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील जनतेच्या घराघरात आणि मनामनात घेऊन जात आहेत. यामुळंच विरोधकांच्या पोटात दुखत आहे. या कारणाने असले आरोप होत आहेत. मात्र 'शासन आपल्या दारी' योजनेच्या धर्तीवर पंजाब सरकारनेही अशी योजना राज्यात लागू केली आहे. हेच या योजनेचं यश आहे. 'शासन आपल्या दारी' योजनेतून गेल्या सात महिन्यात राज्यातील 2 कोटी जनतेला लाभ मिळाल्याचंही शिंदे यांनी यावेळी सांगितलं.

यापूर्वीचं सरकार अडीच वर्ष घरात बसून : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्री पदावर रुजू झाल्यानंतर त्यांच्या कामाचा सपाटा तुम्ही पाहिला आहे. शासन आपल्या दारी योजना त्यांनी गोरगरिबांच्या घरात पोहोचवली, यापूर्वीचं सरकार अडीच वर्ष घरात कुलूप लावून बसलं होतं, असा हल्लाबोलही खासदार शिंदे यांनी महाविकास आघाडीवर केला.

तलाठी भरतीमागील सत्य चौकशीतून बाहेर येईल : राज्यात झालेल्या तलाठी भरती परीक्षेत अनेक उमेदवारांना 200 गुणांची परीक्षा असताना 200 हून अधिक गुण मिळाले आहेत. यापूर्वी झालेल्या परीक्षांमध्ये पात्र नसलेल्या उमेदवारांची नावे गुणवत्ता यादीत आल्यानं राज्यातील तलाठी भरती परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. याबाबत विचारलं असता शिंदे यांनी याबाबत चौकशी होईल आणि चौकशीतून सत्य लोकांसमोर येणार असल्याचं सांगितलंय.

हेही वाचा -

  1. 'शासन आपल्या दारी कार्यक्रमात' सरकारची उधळपट्टी, खर्चावर श्वेतपत्रिका काढा-सुप्रिया सुळे
  2. CM Eknath Shinde in Buldhana: दोन उपमुख्यमंत्री 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाला गैरहजर, मुख्यमंत्र्यांनी 'ही' दिली प्रतिक्रिया
  3. 'शासन आपल्या दारी' या अभियानाच्या माध्यमातून 1 कोटी 84 लाख लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.