ETV Bharat / state

... तर आपल्याला आगामी निवडणुकीत मतदान करता येणार नाही - मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी

author img

By

Published : Nov 16, 2021, 7:40 PM IST

Updated : Nov 16, 2021, 8:06 PM IST

मतदान ओळखपत्र असल्यावर आपल्याला मतदान करता येतेच असे नाही. आपले मतदार यादीत नाव असेल तर मतदान करता येते हे बरोबर आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपले मतदार यादीत नाव आहे, की नाही हे तपासा. शिवाय नाव नसेल तर तात्काळ नोंदवा, असे आवाहनही मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले.

मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी
मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी

कोल्हापूर - मतदारयादीमधला तरुणांचा सहभाग खूपच कमी असणे ही एक चिंतेची बाब आहे. जानेवरीमध्ये अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल त्यात जर आपले नाव असेल तर आपल्याला मतदान करता येणार नाही. ही माहिती प्रधान सचिव तसेच मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत देशपांडे (chief electoral officer Shrikant Deshpande) यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत देशपांडे (Shrikant Deshpande on voters registration) म्हणाले, की राज्यात एकूण लोकसंख्येपैकी 3.46 टक्के 18 ते 19 वयोगटातील तरुण आहेत. मात्र, त्यातील केवळ 1.23 टक्के तरुणांनीच मतदार नोंदणी केली आहे. शिवाय 20 ते 29 वयोगटातील परिस्थितीसुद्धा अशीच आहे. या वयोगटातील 17.78 टक्क्यांपैकी केवळ 13.41 टक्के तरुणांनी मतदार नोंदणी केली आहे.

मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी
हेही वाचा-GANJA SEIZED IN HYDERABAD मराठमोळे आयुक्त असलेल्या रचकोंडा पोलिसांची कामगिरी; 2.08 कोटींचा गांजा जप्त

आपले नाव यादीमध्ये आहे की नाही हे तपासा, अन्यथा...

मतदान ओळखपत्र असल्यावर आपल्याला मतदान करता येतेच असे नाही. आपले मतदार यादीत नाव असेल तर मतदान करता येते हे बरोबर आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपले मतदार यादीत नाव आहे, की नाही हे तपासा. शिवाय नाव नसेल तर तात्काळ नोंदवा, असे आवाहनही मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी केले. विशेष म्हणजे एखाद्याकडे मतदान ओळखपत्र मिळाले नसेल किंवा इतर कोणतेही ओळखपत्र दाखवून मतदान करता येते. त्यामुळे मतदार यादीत नाव आहे की नाही हे पाहणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा-Ban On Zakir Naik IRF : गृह मंत्रालयाने झाकीर नाईकच्या एनजीओवरील बंदी अजून ५ वर्षांसाठी वाढवली

लवकरच दुबार मतदार संख्या शून्य होईल-

एखाद्याचे नाव दोन ठिकाणी मतदार यादीच नावे (Double voter registration) असल्याची काही उदाहरणे आहेत. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात याचे प्रमाण अतिशय कमी आहे. 31 लाख मतदारांपैकी केवळ 57 जणांचे (Total Double voter registrations in Kolhapur) सध्या दुबार मतदान लागले आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत हे अतिशय नगण्य आहे. महाराष्ट्रात तब्बल 4 लाख दुबार मतदार होते. ही यादी दुरुस्त करून जानेवारी 2021 पर्यंत केवळ 10 हजार दुबार मतदार आहेत. त्यामध्येही दुरुस्ती होणार असून जानेवारी 2022 मध्ये प्रसिद्ध होणार आहे. या नवीन मतदार यादीत ही संख्या शून्य होईल, अशी माहिती मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.

हेही वाचा-पहिले समलैंगिक वकील सौरभ किरपाल होणार दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश!

लोकसंख्येच्या तुलनेत तरुण वयोगटातील किती जणांनी केली मतदार नोंदणी

  • राज्यात 18 ते 19 वयोगटात एकूण 4 कोटी 40 लाख 2 हजार 150 इतके तरुण आहेत. त्यातील केवळ 1 कोटी 56 लाख 9 हजार 334 तरुणांनी मतदार नोंदणी केली आहे. हे प्रमाण अतिशय कमी असून एक गंभीर बाब आहे. राज्याची एकूण लोकसंख्या 87 कोटी 93 लाख 4 हजार 541 इतकी आहे यापैकी 3.46 टक्के 18 ते 19 वयोगटातील आहेत. त्यातील केवळ 1.23 टक्के तरुणांनी मतदान नोंदणी (young voters registration in Maharashtra) केली आहे.
  • राज्यात 20 ते 29 वयोगटात एकूण 22 कोटी 59 लाख 2 हजार 647 इतके तरुण आहेत. त्यातील केवळ 17 कोटी 4 लाख 2 हजार 984 तरुणांनी मतदार नोंदणी केली आहे. राज्याची एकूण लोकसंख्या 87 कोटी 93 लाख 4 हजार 541 इतकी आहे. यापैकी 17.78 टक्के 20 ते 29 वयोगटातील आहेत. त्यातील केवळ 13.41 टक्के तरुणांनी मतदार नोंदणी केली आहे.

Last Updated : Nov 16, 2021, 8:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.