ETV Bharat / state

‘भारत माता की जय!’ घोषणा देत श्रमिक विशेष रेल्वे बिहारकडे रवाना - shramik express kolhapur

बुधवारी जिल्ह्यातील विविध तालुक्यातील मजुरांना राज्य परिवहन महामंडळाच्या 49 बसमधून छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे आणले. याठिकाणी प्रवासाची रेल्वे तिकीटे त्यांना देण्यात आली. थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर याचा वापर करत त्यांना रेल्वेच्या बोगीमध्ये प्रवेश देण्यात आला.

‘भारत माता की जय!’ घोषणा देत श्रमिक विशेष रेल्वे बिहारकडे रवाना

author img

By

Published : May 14, 2020, 8:25 AM IST

कोल्हापूर - येथून ‘भारत माता की जय !’ अशा घोषणा देत बिहारमधील 1 हजार 320 मजूर 'श्रमिक' या विशेष रेल्वेने बुधवारी बिहारकडे रवाना झाले. सायंकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी ही विशेष रेल्वे बिहारकडे रवाना झाली. प्रशासनाने त्यांची केलेली सुविधा आणि गावी जाण्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. प्रवाशांनीही टाळ्या वाजवून आणि घोषणा देवून हा आनंद व्यक्त केला.

विशेष रेल्वे बिहारकडे रवाना झालेले परप्रांतीय प्रवासी

बिहार शासनाकडून मंजुरी आल्यानंतर प्रशासनाने जिल्ह्यातील विविध तालुक्यातील मजुरांना राज्य परिवहन महामंडळाच्या 49 बसमधून छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे आणले. याठिकाणी प्रवासाची रेल्वे तिकीटे त्यांना देण्यात आली. थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर याचा वापर करत त्यांना रेल्वेच्या बोगीमध्ये प्रवेश देण्यात आला.

डॉ. नरकेंच्या समन्वयाखाली मजुरांसाठी किटची व्यवस्था -

गेले तीन दिवस जिल्ह्यामधून आपापल्या गावी परतणाऱ्या विविध मजुरांना त्यांच्या दोन दिवसाच्या जेवणाची व्यवस्था सतेज पाटील यांच्यातर्फे आणि डॉ. महादेव नरके यांच्या समन्वयाखाली सुरू आहे. प्रत्येक कामगाराला जेवण, नाश्ता, पाण्याची बॉटल आणि मास्क याचे वितरण होत आहे. यासाठी एसएच पाटील, डीडी पाटील, विनायक सूर्यवंशी, आनंदा करपे, किशोर आयरे, सागर पाटील, प्रविण पाटील, पार्थ मुंडे, दिपक थोरात, वैभव देसाई, तौफिक मुल्लाणी, सचिन चव्हाण, संजय पोवार, विजय सूर्यवंशी, आदित्य कांबळे, अक्षय शेळके, अभिजीत भोसले, प्रशांत गणेशाचार्य हे पथक सहभागी झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.