कोल्हापूर - शिवराज्याभिषेक दिनादिवशी आता दरवर्षी शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन साजरा करावा, असे आदेश ग्रामविकास विभागाने काढले होते. शिवाय शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभी करण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आला होता. त्यानुसार कोल्हापूरात जिल्ह्यातील गावागावांत स्वराज्य गुढी उभी करण्यात आली आहे. जिल्ह्यासह राज्यभरातील नागरिकांमधून या निर्णयाचे जोरदार स्वागतही होत आहे.
गावागावांत उभारली 'शिवशक राजदंड स्वराज्य गुढी'; नागरिकांमध्ये उत्साह - कोल्हापूर लेटेस्ट न्यूज
ग्रामविकास विभागाने शिवस्वराज्य दिन साजरा करण्याच्या घेतलेल्या या नवीन निर्णयाचे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच गावांमधून स्वागत करण्यात आले. अनेकांमध्ये सकाळपासून शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ग्रामपंचायत समोर शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारण्यासाठी सर्वांमध्ये उत्साह पाहायला मिळत होता.
शिवशक राजदंड स्वराज्य गुढी