कोल्हापूर - महाराष्ट्र एकीकरण समिती विरोधात वक्तव्य करणाऱ्या भीमाशंकर पाटील यांचा शिवसैनिकांनी निषेध केला आहे. 'महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकांना गोळ्या घाला', असे वक्तव्य त्यांनी केले होते.
यानंतर शिवसेनेने भीमाशंकर पाटील यांची प्रतिकात्मक तिरडी काढल्याचा प्रकार समोर आला आहे. कागलपासून जवळच असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर सेनेने या प्रकारची अंत्ययात्रा काढली असून या तिरडीचे दहन करण्यात आले. यावेळी कर्नाटक सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करून भीमाशंकर पाटील यांचा निषेध करण्यात आला.
हेही वाचा - सीमा प्रश्नी भीमाशंकर पाटलांच्या 'त्या' वक्तव्यावर एन. डी. पाटील म्हणतात...
महाराष्ट्र एकीकरण समितीमधील एकाही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर शिवसेनेशी गाठ आहे, असा इशारा सेनेचे खासदार धैर्यशील माने यांनी दिला होता. आता भीमाशंकर पाटील यांच्या वक्तव्यानंतर अनेक ठिकाणी तीव्र पडसाद उमटत आहेत. आज शिवसेनेच्या वतीने भीमाशंकर पाटील यांची प्रतिकात्मक तिरडी जाळण्यात आली. यावेळी 'हिम्मत असेल आम्हाला गोळ्या घाला', असे आव्हान शिवसेनेने दिले आहे.