ETV Bharat / state

Panhala Fort Liquor Party : दारू ढोसणाऱ्या 'त्या' लोकांवर कारवाई केली नाही तर...; शिवप्रेमींचा पोलिसांना इशारा - दारू ढोसणाऱ्या त्या लोकांवर कारवाई केली नाही तर

पन्हाळगडावरील झुणका भाकरी केंद्रावर दारु पार्टी झाल्याचा व्हिडिओ समोर आला होतो. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ झुणका भाकरी ( Jhunka Bhakar Center Panhal Fort ) स्टॉल चालकावर गुन्हा दाखल केला. मात्र तिथे जे पर्यटक खुलेआम दारू पार्टी करत होते, यांच्यावर कोणत्याही पद्धतीने गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे शिवप्रेमी चांगलेच संतापले आहेत. महाराष्ट्रातील नागरिकांच्या भावना दाखवून खुलेआम गडावर दारू पिणाऱ्यांवर कोणत्याही परिस्थिती गुन्हा दाखल करावा आणि त्यांना कडक शिक्षा करावी, अशी मागणी आता केली जात आहे.

Panhala Fort Liquor Party
Panhala Fort Liquor Party
author img

By

Published : Jul 26, 2022, 5:11 PM IST

Updated : Jul 28, 2022, 12:27 PM IST

कोल्हापूर - दोन दिवसांपूर्वी कोल्हापुरातील ऐतिहासिक पन्हाळगडावर एका झुणका भाकरी स्टॉलवर 15 ते 20 जणांच्या ग्रुपने खुलेआम दारू पार्टी केली. याबाबतच एक व्हिडिओ सुद्धा समोर आला असून यामध्ये अनेक महिला तसेच पुरुष दारू ढोसत असताना दिसत आहेत. याची माध्यमांनी बातमी लावताच पोलिसांनी तत्काळ झुणका भाकरी ( Jhunka Bhakar Center Panhal Fort ) स्टॉल चालकावर गुन्हा दाखल केला. मात्र तिथे जे पर्यटक खुलेआम दारू पार्टी करत होते, यांच्यावर कोणत्याही पद्धतीने गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे शिवप्रेमी चांगलेच संतापले आहेत. महाराष्ट्रातील नागरिकांच्या भावना दाखवून खुलेआम गडावर दारू पिणाऱ्यांवर कोणत्याही परिस्थिती गुन्हा दाखल करावा आणि त्यांना कडक शिक्षा करावी, अशी मागणी आता केली जात आहे. शिवप्रेमी हर्षल सुर्वे यांनी याबाबतची मागणी केली आहे.

...मग शिवप्रेमींच्या भावना दुखावून खुलेआम दारू पिणाऱ्यांवर का नाही? : काल सोमवारी पन्हाळा पोलिसांनी ज्या ठिकाणी संबंधित पर्यटक दारू पार्टी करत होते त्या झुणका भाकरी स्टॉलवर गुन्हा दाखल केला आहे. स्टॉलचे चालक दिलीप अतिग्रे यांच्याकडे तपासणी केली असता त्यांच्याकडे दारूच्या बाटल्या आढळल्या. त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र दारू बंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला. मात्र जे पर्यटक दारू पिताना पाहायला मिळाले त्यांच्यांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सुरू आहे. शिवाय ते पर्यटक परराज्यातील असल्याचे समजले मात्र त्यांना कुठूनही शोधून काढा आणि कडक शासन करा जेणेकरून इथून पुढे जर कोणी गडावर दारू पिण्याचे धाडस करत असेल तर त्यांना काय शिक्षा असते याचा संदेश जाईल, असेही हर्षल सुर्वे यांनी म्हटले आहे.

प्रतिक्रिया देताना शिवप्रेमी हर्षल सुर्वे

काय आहे प्रकरण? : गेल्या अनेक दिवसांपासून पन्हाळगडच्या संवर्धनासाठी अनेकजण आंदोलन मोर्चे काढत आहेत. प्रशासनाचे गडाकडे होत असलेल्या दुर्लक्षाची जाणीव करून देत आहेत. अशाच एक धक्कादायक व्हिडिओ आता समोर आला होता. ज्यामध्ये काही पर्यटक पन्हाळगडावरील एका झुणका भाकरी केंद्रावर चक्क खुलेआम दारू ढोसताना दिसत आहेत. एखाद्या बिचवर पार्टी करावी अशाच पद्धतीने गडावरील या केंद्रावरून दारू आणि बियर पिताना हे सगळे दिसत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये अनेक महिला सुद्धा दिसत आहेत. एक-दोन नव्हे तर अनेक दारूच्या आणि बियरच्या बाटल्या याठिकाणी टेबलवर आढळून आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांत तक्रार देत झुणका भाकर केंद्राच्या मालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दारु पितानाचा व्हायरल व्हिडिओ

हेही वाचा - Panhalagad Police : दारू पार्टी प्रकरणी झुणका भाकर केंद्र आणि पर्यटकांवर पोलिसांत गुन्हा दाखल

Last Updated : Jul 28, 2022, 12:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.