ETV Bharat / state

Shivkalin Mardani Khel: शिवकालीन मर्दानी खेळांचे गणेशोत्सवात वाढलं आकर्षण; जाणून घ्या खेळांच्या इतिहासासह फायदे - shivkalin mardani khel benefits

Shivkalin Mardani Khel : यंदाच्या गणेशोत्सवात ढोलताशा बरोबरच शिवकालीन मर्दानी खेळांना सुद्धा मागणी वाढलीय. हे शिवकालीन मर्दानी खेळ कसे आहेत, त्यांचा इतिहास काय आहे, या खेळांचे फायदे काय आहेत असे अनेक प्रश्न आपल्यासमोर आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या विशेष रिपोर्टमधून सविस्तर जाणून घेऊया. (shivkalin mardani khel benefits)

shivkalin mardani khel
शिवकालिन मर्दानी खेळ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 17, 2023, 3:50 PM IST

Updated : Sep 17, 2023, 5:09 PM IST

शिवकालीन मर्दानी खेळ

कोल्हापूर Shivkalin Mardani Khel : महाराष्ट्रातील शिवकालीन युद्ध कला सर्वत्र प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या युद्ध कलेला मर्दानी खेळ म्हणून ओळखलं जातं. याच मर्दानी खेळांची परंपरा टिकवण्याचं काम कोल्हापूरकर करत आहेत. कोल्हापूरच्या पेठांमध्ये अनेक असे आखाडे आहेत, ज्यामध्ये मर्दानी खेळांचा वारसा आजही जपला जातोय. काही दिवसांवरती आलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या मर्दानी खेळांना राज्यभरातून मोठी मागणी आहे. याच पाश्वर्भूमीवर मर्दानी खेळांचा सराव कसा असतो, ते जाणून घेऊया.

शिवकालीन युद्ध कला : छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध कलेवर आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्य स्थापन केलं. याच युद्ध कलेच्या जोरावर त्यांनी शत्रूंना गुडघे टेकायला भाग पाडलं. मुलगा चालायला लागला की युद्धकलेचं शिक्षण देण्याची परंपरा होती. पुरुषांप्रमाणेच महिलांही युद्धकला कौशल्ये आत्मसात करत असत. रणांगण गाजवणारे अनेक शूरवीर याच मातृभूमीत होऊन गेले. त्याचप्रमाणे राजमाता जिजाऊ माँसाहेब, महाराणी ताराबाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, राणी चन्नम्मा यासारख्या कर्तबगार महिलांनी रणांगण गाजवून स्वराज्याचं रक्षण केलं. कालांतराने ही युद्ध कला मर्दानी खेळांच्या रूपात पुढे आली. याच थोर रणरागिनींचा वारसा कोल्हापूरकर आजही जपत आहेत. कोल्हापुरात मर्दानी खेळांसाठी अनेक आखाडे आणि तालीम प्रसिद्ध आहेत. याच आखाड्यांच्या माध्यमातून पुरुषांबरोबरच महिलांही मर्दानी खेळांमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी असतात. शिवाय गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या मर्दानी खेळांना आता मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नागपूरसह इतर राज्यातही मोठी मागणी होतेय. (shivkalin mardani khel history)

मर्दानी खेळांची परंपरा : शिवकालीन ढोल, ताशा वाद्यांसह मर्दानी खेळांच्या या परंपरेला ही अनन्य साधारण महत्त्व आहे. त्यामुळं ही परंपरा कशी टिकवली जाईल, भावी पिढीच्या रक्तात कशी उतरली जाईल, यासाठी हे आखाडे विशेष प्रयत्न करतात. तसंच या मर्दानी खेळांमध्ये अनेक प्रकारचे खेळ आहेत. युद्ध कलेच्या नीती आहेत. पुरुषांबरोबर तरुणीही या मर्दानी खेळात अग्रेसर सहभाग नोंदवतात. अगदी नऊवारी साडी नेसून आणि कपाळावर चंद्रकोर लावून तरुणी या खेळांमध्ये पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढे आहेत. विशेष म्हणजे हातात काठी, ढाल, तलवार असं एखादं शस्त्र घेतलं की, जणूकाही त्यांच्या अंगातील रक्तच या ठिकाणी सळसळत असतं. या युद्ध कलेचा वापर महिला, युवती या आत्मसंरक्षणासाठीही करताना दिसून येतं. या मर्दानी खेळात अवघ्या सहा वर्षाच्या चिमुरडीपासून साठ वर्षाच्या व्यक्तीही हिरीरीनं आपला सहभाग नोंदवतात. (shivkalin mardani khel benefits)

मुलींना संरक्षणाचे धडे : सध्याच्या युगात अनेकजण आपल्या मुलींना संरक्षणाचे धडे देण्यासाठी कराटे, बॉक्सिंगसारख्या खेळांमध्ये घालतात. मात्र, समाजातील प्रत्येक युवतीनं या युद्ध कला आणि मर्दानी खेळ शिकणं काळाची गरज आहे. अवघ्या सहा वर्षाच्या असणाऱ्या एका चिमुकलेला तिच्या कुटुंबीयांनी उल्हासपणे या आखाड्यात पाठवलं. वर्षभरात या चिमुकलीनं अगदी अलगदपणं या युद्ध कलेतील काही निती शिकल्या. तसं समाजातील प्रत्येक पालकानं आपल्या मुलींना मर्दानी खेळ शिकवले पाहिजे, असं पालकांचं म्हणणे आहे. (shivkalin mardani khel in ganeshotsav)

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागणी : ही शिवकालीन युद्धनिती, मर्दानी खेळ, आपल्या पूर्वजांनी दिलेला एक अनमोल ठेवा आहे. सध्याच्या डीजे आणि गाण्यावर थिरकणाऱ्या या तरुणाईला हा इतिहास समजणं, याचं संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेकजण ही शिवकालीन कला दाखवण्यासाठी आखाड्यांना मागणी करत आहेत.

हेही वाचा :

  1. मर्दानी खेळ करणाऱ्या 85 वर्षाच्या शांताबाईंचा प्रेरणादायी जीवन प्रवास
  2. Dahi Handi Pro Govin? क्रीडाचा दर्जा मिळाल्यानंतर यंदा प्रथमच जन्माष्टमीनिमित्त 'प्रो गोविंदा' स्पर्धा, सरकार देणार 'इतक्या' लाखांची बक्षिसे
  3. Shiv Era Martial Act: कोल्हापूरात एकेकाळी व्हायच्या 'फरी गदकाच्या भव्य स्पर्धा, पाहूया काय होता हा खेळ

Last Updated : Sep 17, 2023, 5:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.