ETV Bharat / state

Shiv Sainik wrote letter to Uddhav Thackeray: आम्ही तुमच्यासोबत... कोल्हापुरातील शिवसैनिकाने उद्धव ठाकरेंना लिहिले रक्ताने पत्र - letter written in blood

कोल्हापूरमध्ये हातकणंगले तालुक्यातील ( Hatkanangle Taluka ) एका शिवसैनिकाने उद्धव ठाकरे यांना पत्र  लिहिले आहे. आपल्या रक्ताने उद्धव ठाकरे यांना पत्र  लिहिले ( Shiv Sainik wrote letter in blood ) आहे. आम्ही आपल्यासोबत आहोत असे त्याने या पत्रात म्हटले आहे. सुरज विलास पाटील (रा. टोप, ता. हातकणंगले) असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्याकडे या कार्यकर्त्याने हे पत्र सुपूर्द केले.

Shiv Sainik wrote letter to Uddhav Thackeray
शिवसैनिकाचे उद्धव ठाकरे यांना पत्र
author img

By

Published : Jul 20, 2022, 1:02 PM IST

कोल्हापूर - एकीकडे शिवसेनेचे आमदार तसेच खासदार शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Shiv Sena party chief Uddhav Thackeray ) यांना सोडून एकनाथ शिंदे गटात जाऊन बसले आहेत. अशातच उद्धव ठाकरेंना मात्र आधार देण्यासाठी अनेक शिवसैनिक आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. कोल्हापूरातल्या हातकणंगले तालुक्यातील ( Hatkanangle Taluka ) एका शिवसैनिकाने तर आपल्या रक्ताने उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले ( Shiv Sainik wrote letter in blood ) आहे. आणि ते पाठवले आहे. आम्ही आपल्यासोबत आहोत असे त्याने या पत्रात म्हटले आहे. सुरज विलास पाटील (रा. टोप, ता. हातकणंगले) असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांच्याकडे या कार्यकर्त्याने हे पत्र सुपूर्द केले.

कोल्हापूरचे दोन खासदार, एक मंत्री, एक आमदार आणि एक माजी आमदार शिंदे गटात - कोल्हापूरचे दोन्ही खासदार ज्यामध्ये संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचा समावेश आहे ते नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात ( CM Eknath Shinde group ) जाऊन मिळाले आहेत. याआधी, आरोग्यराज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार प्रकाश आबिटकर आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर हे एकनाथ शिंदे गटात जाऊन मिळाले आहेत. कोल्हापूर ( Kolhapur ) जिल्ह्यात शिवसेनेला एवढा मोठा धक्का बसल्याने अनेक कट्टर शिवसैनिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. अशातच हातकणंगले तालुक्यातील टोपमधील सूरज पाटील या शिवसैनिकाने आपल्या रक्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आम्ही आपल्या सोबत आहोत. आमचा तुम्हाला नेहमी पाठिंबा असेल अशा पद्धतीचे पत्र लिहले आहे. मुरलीधर जाधव ( District Chief Muralidhar Jadhav ) यांच्याकडे त्याने हे पत्र सुपूर्द केले आहे.

कट्टर कार्यकर्ते असल्याने शिवसेनेला कोणीही धक्का लावू शकत नाही - दरम्यान, मुरलीधर जाधव यांच्याकडे या सुरज पाटील या कार्यकर्त्याने पत्र सुपूर्द केले आहे. त्यानंतर संपर्कप्रमुख अरुण दुधवढकर यांनी सुद्धा या कार्यकर्त्यांशी फोनवरून संपर्क साधला आणि त्यांच्या पक्षनिष्ठेबाबत कौतूक केले. असे कार्यकर्ते असल्यानेच शिवसेना भक्कम असून याला कोणीही धक्का लावू शकत नसल्याने शिवसैनिकांसह जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी म्हटले आहे.

शिवसैनिकाचे उद्धव ठाकरे यांना पत्र

मीरा-भाईंदरमध्ये 10 नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या पाठीशी - शिवसेनेतील बंडखोरीनंतर अनेक नगरसेवक शिंदे गटात ( Shinde Group ) सामील होत आहेत. मीरा-भाईंदरच्या काही नगरसेवकांनी आमदार प्रताप सरनाईक ( MLA Pratap Sarnaik ) यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गटाला पाठिंबा दिला. १८ नगरसेवक सोबत आल्याचा दावा मुख्यमंत्री आणि आमदार सरनाईक यांनी केला असताना मीरा-भाईंदरच्या गटनेत्या नीलम धवन ( Neelam Dhawan ) यांनी तो खोडून काढला होता. केवळ ९ नगरसेवक शिंदे गटासोबत गेले ( 9 corporators Support Shinde group )असून दहा नगरसेवक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी ठाम उभे असल्याचे त्या म्हणाल्या होत्या.सध्या पक्षप्रमुखांच्या मागे मोठा व्याप लागला असून त्यांना एकट सोडून जाणार नाही, असे गटनेत्या नीलम धवन यांनी सांगितले होते. तसेच पक्षप्रमुखांची भेट घेणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा - Supreme Court Hearing Shivsena Petition : लोकशाही धोक्यात - कपिल सिब्बल; शिवसनेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.