ETV Bharat / state

Sharad Pawar : छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्य रक्षक म्हणण्यात काहीही चुकीचे नाही - शरद पवार - Bhagat Singh Koshyari

राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी राजे बद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात संभाजी राजे स्वराज्य रक्षक की धर्मवीर यावर मोठा वाद पेटला आहे. ( Sharad Pawar statement ) अनेक ठिकाणी यावरून स्टिकर वॉर देखील रंगला आहे. मात्र छत्रपती संभाजी महाराज यांना स्वराज्य रक्षक म्हणणे यामध्ये काहीही चुकीचे नाही. संभाजी महाराज यांनी स्वराज्यावर आलेले अनेक ( Sharad Pawar ) हल्ले परतवून लावले आहेत असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांची पाठराखण केली आहे. (calling sambhaji religious heroses sharad pawar )

Sharad Pawar
शरद पवार
author img

By

Published : Jan 8, 2023, 11:45 AM IST

Updated : Jan 8, 2023, 12:14 PM IST

शरद पवार

कोल्हापूर : छत्रपती संभाजी राजे धर्मवीर नाहीतर स्वराज्य रक्षक होते. असे विधान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी काही दिवसापूर्वी केले होते. यानंतर राज्यात अनेक ठिकाणी भाजपच्यावतीने त्यांच्या विरोधात आंदोलना देखील झाली. ( sambhaji maharaj as swarajyarakshak ) शिवाय सध्या धर्मवीर आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराज अशा पद्धतीचे स्टिकर देखील समोर येत आहेत. मात्र भाजपची ही भूमिका चुकीची असून छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यावर आलेले अनेक संकट परतावून लावले. यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षक म्हणणे काही चुकीचे नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी म्हटले आहे. तसेच सत्ता हातात आली की जमिनीला पाय ठेवून वागायचे असते. (calling sambhaji religious heroses sharad pawar )

नेत्यांकडून टोकाची भूमिका घेतली जात आहे : आताचे सत्ताधारी असे वागताना दिसत नाहीत. काही नेत्यांकडून टोकाची भूमिका घेतली जात आहे. हे योग्य नाही असे म्हणत नाव न घेता नारायण राणे यांना त्यांनी टोला लगावला आहे. तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे एका कार्यक्रमात बोलताना मी इथे नाखुश आहे असे म्हणाले होते. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले राज्यपाल इथे नाखूष असतील तर आम्ही देखील त्यांच्याबद्दल नाखूष आहोत. शरद पवार हे विधान करताच सर्वांमध्ये एकच हास्यकल्लोळ झाला. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, राज्यपाल हे महत्वाचे पद आहे. महाराष्ट्र राज्याला अनेक राज्यपाल हे उच्च दर्जाचे लाभले. कोणताही पक्ष असला तरी त्या पदावरील राज्यपालांनी योग्य भूमिका घेतली. मात्र भगतसिंह कोश्यारी हे पहिले राज्यपाल आहेत, ज्यांच्यावर सतत टीका होत आहे आणि तेही जनता टीका करते.

महाराष्ट्रात सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढण्याची आमची इच्छा : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हेच कोल्हापुरात असून यावेळी सीमा भागातील महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली. सीमा वादा संदर्भात चर्चा झाली याबाबत शरद पवार यांनी सीमा भागाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्यावेळी आपली बाजू योग्य पद्धतीने मांडावी. तसेच दिल्ली मध्ये देखील याबाबत बैठक व्हावी अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून केली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आगामी काळात महाराष्ट्रात सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणून लढण्याची आमची इच्छा आहे. मात्र आमच्या आमच्यात काही मदभेद झाले तर आम्ही एकत्र बसून योग्य मार्ग काढू. भाजप विरुद्ध काँग्रेस, भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप विरुद्ध शिवसेना असे आरोप प्रत्यारोप चालूच राहतील असे ही ते म्हणाले आहेत. तर राहुल गांधी यांची सुरू असलेली भारत जोडो यात्रेला मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद मिळत असल्याने काही पक्षांनी टीका टिंगलटवाळी सुरू केली गेली. राहुल गांधी यांनी एका पक्षा पुरते आपला कार्यक्रम ठेवला नाही, त्यामुळे त्यामध्ये सर्वसामान्य, विविध पक्षाचे कार्यकर्ते नेते त्यांच्यासोबत सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. राहुल गांधी यांच्या पदयात्रेचा फायदा होईल असे शरद पवार म्हणाले आहेत.

अशी झाली सुरुवात? विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत छत्रपती संभाजी महाराज यांचा धर्मवीर नव्हे तर स्वराज्यरक्षक असा उल्लेख केला. त्यामुळे भाजपने आकाशपाताळ एक करत राज्यभर आंदोलन सुरू केले होते. दुसरीकडे त्यानंतर लगेचच युवराज संभाजीराजे भोसले यांनी अजित पवार यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे सांगितले. शिवाय छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर होते, असे म्हणाले. त्यामुळे भाजपच्या आंदोलनाला धार चढली होती. या साऱ्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

अजित पवारांचे वक्तव्य : छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, तर स्वराज्य रक्षकच होते असे अजित पवार हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणाले होते. त्याचे पडसाद आता उमटत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांची कारकीर्द पहिली तर मोघलांच्या विरोधात औरंगजेबच्या विरोधात लढण्यात त्यांचं खूप वेळ गेला.या देशाचं आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी महाराजांनी प्राणाची आहुती दिली. हा इतिहास संपूर्ण भारताला माहीत आहे.त्या काळात औरंगजेबने एवढे अत्याचार केले अस असताना लाचार होऊन मतांसाठी अजित पवार यांनी जे कृत्य केल आहे ते निंदनीय असून त्यांनी संपूर्ण समाजाची माफी मागावी.अशी मागणी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली आहे.

Last Updated : Jan 8, 2023, 12:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.