ETV Bharat / state

देशातील लोकांची उपासमार घालवण्यासाठी पंतप्रधान मोदी उपवास करणार का? शरद पवारांचा सवाल

Sharad Pawar On Narendra Modi : २२ जानेवारी रोजी राम मंदिरात श्री रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यानिमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतंय. राम मंदिर निमंत्रण मुद्द्यावरुन राजकारणंही तापलंय. यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केलीय.

Sharad Pawar On PM Narendra Modi
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 16, 2024, 9:16 PM IST

कार्यक्रमात बोलताना शरद पवार

कोल्हापूर Sharad Pawar On Narendra Modi : अयोध्येत राम मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमाचा मी आदर करतो, पण गरिबी घालवण्यासाठी देखील असा कार्यक्रम सरकार हाती घेईल का? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 11 दिवस उपवास करत आहेत. तसाच उपवास देशातील लोकांची उपासमारी घालवण्यासाठी पंतप्रधान मोदी करणार का? असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी उपस्थित केलाय. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील निपाणीत आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन पदाधिकारी यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

राम मंदिराचं होत आहे राजकारण : देशातील सत्ताधारी मंडळींकडून धार्मिक प्रश्नावर लोकांची मनं वळवण्याचा प्रयत्न केला जातोय. अयोध्येचा जय श्रीराम, हनुमान याबद्दल आम्हाला आदर आहे. मात्र, यानिमित्तानं देशात धार्मिक धूर्वीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे. अयोध्येतील मशीद पडल्यानंतर येथे राम मंदिर बांधण्याबाबतचा निर्णय राजीव गांधी यांच्या कार्यकाळात झाला होता, अशी आठवणही पवार यांनी यावेळी सांगितली. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या हस्ते शिलान्यास झाला होता, मात्र, आता सत्ताधारी मंडळींकडून राम मंदिराचं काम राहिलं बाजूला अन् मंदिराचं राजकारण सुरू केलंय. अयोध्येतील राम मंदिराचा आता भाजपा आणि आरएसएस मतासाठी फायदा करून घेत असल्याचंही पवार यांनी सांगितलंय.

सरकारला शेतकऱ्यांची आस्था नाही : मी कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं होतं. पण आज देखील शेतकरी कर्जात आहे. कर्जमाफीसाठी आम्ही या सरकारकडं वारंवार प्रयत्न करतोय. मात्र, या सरकारला शेतकऱ्यांची आस्था नाही. या देशात उद्योगपतींची कर्जमाफ होतात पण शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाहीत ही शोकांतिका आहे. देशात चुकीची आर्थिक धोरणं राबवली जात आहेत, अशी चुकीची धोरणं घेणाऱ्या लोकांना बाजूला केलं पाहिजे.‌ कर्नाटक राज्यातील निकाल विरोधकांचा आत्मविश्वास वाढवणारा असल्याचंही पवार यांनी सांगितलं.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलांची सरकारवर टीका : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नूतन पदाधिकारी मेळाव्यात बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, 'कर्नाटक विधानसभा निवडणुकीत हनुमानजवळ करायचा कार्यक्रम झाला होता. आता रामाला जवळ केलं जातंय. गोरगरिबांचे प्रश्न दुर्लक्षित राहिले आहेत. नको त्या गोष्टींना प्राधान्य दिलं जातंय. महागाई आणि इतर समस्या झाकून ठेवण्यासाठी भाजपा सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करतंय.'

हेही वाचा -

  1. 'राम मंदिराला विरोध नाही, लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपाचं नियोजन'
  2. "पंतप्रधान मोदींनी देवेंद्र फडणवीसांचे टोचले कान", सुप्रिया सुळेंची उपरोधिक टीका
  3. शरद पवारांनी सपत्नीक पाहिला 'सत्यशोधक' चित्रपट; राज्य सरकारकडं करणार 'ही' मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.