कोल्हापूर -कोरेगाव भीमा हिंसाचाराचा तपास एनआयएकडे सोपविण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. उध्दव ठाकरे यांचा हा निर्णय अयोग्य आहे, असे सांगत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा -निमंत्रण पत्रिकेचा वाद; महापौरांकडून प्रोटोकॉलचा भंग, गुन्हा दाखल करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश
गृह खात्याच्या अधिकाऱ्यांची कोरेगाव-भीमा प्रकरणी वागणूक आक्षेपार्ह होती. याची चौकशी करण्यासाठी सरकारने पावले उचलल्यामुळे केंद्राने राज्याकडून तपास काढून घेतल्याचा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला आहे. ते कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा- आरटीईच्या प्रवेशासाठी नवीन शाळांची नोंदणी अद्याप गुलदस्त्यात
गृह खात्याच्या अधिकाऱ्यांबद्दल आलेल्या तक्रारीवरुन सकाळी याबाबत राज्य सरकारने बैठक घेतली आणि सायंकाळी केंद्राने तपास काढून घेतला. राज्याचा अधिकार केंद्राने काढून घेतल्याचा आरोपही शरद पवार यांनी यावेळी केला आहे. शिवाय, राज्य सरकारने या गोष्टीला पाठिंबा देणे हे योग्य नसल्याचे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाष्य केले आहे.
हेही वाचा- 'देशाची सत्ता २ लोकांच्या हातात, परिवर्तन व्हावं ही तर लोकभावना'
महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीतही भाजपला दणका बसला आहे. महाराष्ट्रात सत्ता बदल झाला आता दिल्लीत भाजप सत्तेपासून दूर गेले. परंतु, प्रत्येक राज्यातील परिस्थिती वेगवेगळी आहे. तरीही भाजपच्या विरोधात अनुकूल वातावरण असल्याचे दिसत नाही. त्यामुळे निश्चितपणे भाजपच्या विरोधात जनमत आहे, असे पवार म्हणाले.