ETV Bharat / state

गृहराज्यमंत्र्यांनी साधला अंबाबाई मंदिर परिसरातील व्यावसायिकांशी संवाद - जोतिबा मंदिर कोल्हापूर

मंदिर परिसरात असलेल्या हार, ओटी, मूर्ती आदी साहित्य विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांशी सुद्धा शंभूराजे देसाई यांनी संवाद साधला. मंदिर परिसरात अनेकांचे व्यवसाय आहेत. मात्र, अद्याप मंदिर उघडण्याबाबत शासनाचा कोणताही निर्णय नाही.

कोल्हापूर
कोल्हापूर
author img

By

Published : Oct 23, 2020, 8:36 PM IST

कोल्हापूर - महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. सुरुवातीला जोतिबा मंदिर परिसरातील नवरात्रौत्सव बंदोबस्त आणि सुरक्षेची पाहणी केल्यानंतर कोल्हापुरातील आई अंबाबाईचे दर्शन घेऊन येथील सुरक्षेसंदर्भात पाहणी केली.

गृहराज्यमंत्र्यांनी साधला अंबाबाई मंदिर परिसरातील व्यवसायिकांशी संवाद

मंदिर परिसरात असलेल्या हार, ओटी, मूर्ती आदी साहित्य विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांशी सुद्धा शंभूराजे देसाई यांनी संवाद साधला. मंदिर परिसरात अनेकांचे व्यवसाय आहेत. मात्र, अद्याप मंदिर उघडण्याबाबत शासनाचा कोणताही निर्णय नाही. त्यामुळे अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी येथील काही व्यवसायिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

हेही वाचा - 'नाथाभाऊंचे समाधान होण्यासाठी लिमलेटची गोळी देतात की कॅडबरी देतात ते पाहू..'

मंदिरच बंद असल्यामुळे दुकाने सुरू करून सुद्धा ग्राहक नाहीत, अशी परिस्थिती असल्याचे काही व्यावसायिकांनी त्यांना बोलून दाखवले. यावेळी मंत्री देसाई यांनी त्या सर्वच व्यावसायिकांच्या समस्या जाणून घेत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. शिवाय येथील व्यावसायिक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेत असलेल्या काळजीबाबत सुद्धा त्यांनी विचारणा केली. दरम्यान, अंबाबाई मंदिराबाहेरूनच त्यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेत अंबाबाईचे दर्शन घेतले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.