ETV Bharat / state

शिरोळमध्ये नदीकाठी आढळली मगरीची सात पिल्ले; प्राणीमित्रांकडून जीवदान - शिरोळ लेटेस्ट न्यूज

चार दिवसांपूर्वीच शिरोळ तालुक्यातल्या कनवाड येथील कृष्णाकाठावर दहा मगरीच्या पिलांचा उन्हाच्या तडाख्याने मृत्यू झाला होता. शवविच्छेदन अहवालामध्ये दिवस भरण्याअगोदर अंड्यांतून मगरीची पिले बाहेर आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते.

मगरीची पिल्ले
मगरीची मृत पिल्ले
author img

By

Published : May 28, 2021, 7:15 AM IST

कोल्हापूर - शिरोळ तालुक्यातल्या वारणा-कृष्णा नदीमध्ये मगरींचा नेहमीच वावर पाहायला मिळातो. आता तर तालुक्यातल्या कोथळी येथील वारणा-कृष्णा नदीच्या संगमावर मगरीची सात पिल्ली आणि तीन अंडी आढळली आहेत. त्या पिलांना नैसर्गिक अधिवासात सोडल्याने त्यांना जीवनदान मिळाले. जयसिंगपूर येथील वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन संस्थेच्या प्राणीमित्रांनी या मगरीच्या पिलांना जीवदान दिले आहे. तर आढळलेली तीन अंडीसुद्धा उबविण्यासाठी ठेवण्यात आली आहेत.

नदीशेजारी शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी
कृष्णा-वारणा नदी पात्रात यापूर्वी अजवळपास 10 ते 12 फूट लांबीच्या मगरी सुद्धा अनेकदा नदीमध्ये दिसल्या आहेत. या मगरींनी जनावरांवर हल्ला केल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. आता येथील नदीच्या संगमावर सात पिल्ली आढळली असून त्यांनासुद्धा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी येथील वीट भट्टी कामगारांना मोठी मगर पाहायला मिळाली होती. याची माहिती कामगारांनी वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन संस्थेच्या प्राणीमित्रांना दिली. या संस्थेतील सदस्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केल्यानंतर त्यांना मगरीची सात पिल्ली आणि तीन अंडी आढळून आली. त्यांनी तात्काळ पिलांना नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. शिवाय आढळलेली 3 अंडीसुद्धा उबविण्यासाठी ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, नदी शेजारील शेतीमध्ये काम करत असताना नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.

चार दिवसांपूर्वी मगरीच्या दहा पिलांचा मृत्यू
दरम्यान, चार दिवसांपूर्वीच शिरोळ तालुक्यातल्या कनवाड येथील कृष्णाकाठावर दहा मगरीच्या पिलांचा उन्हाच्या तडाख्याने मृत्यू झाला होता. याबाबत वन विभागानेही माहीती दिली होती. शवविच्छेदन अहवालामध्ये दिवस भरण्याअगोदर अंड्यांतून मगरीची पिले बाहेर आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. मात्र ही अंडी काहींनी कृत्रिमरित्या काढल्याने यातच दहा पिलांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.