ETV Bharat / state

कोल्हापूर : नाट्यगृहांच्या देखभालीसाठी 200 कोटींचा निधी एफडी करून ठेवावा - प्रशांत दामले - ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले न्यूज

अभिनेते दामले म्हणाले, 'कोरोनानंतर सरकारच्या सर्व नियमांनुसार आम्ही नाट्य प्रयोग सुरू केले आहेत. सध्या पश्चिम महाराष्ट्रात दौरा करत आहे. राज्य सरकारने नाट्यगृहांच्या देखभाल दुरुस्तीसाठी कायमस्वरूपी 200 कोटी रुपयांचा निधी हा एफडी स्वरूपात ठेवावा. म्हणजे त्याच्या व्याजावर राज्यातील नाट्यगृहांची देखभाल, दुरुस्ती होऊ शकते.' त्यासाठी मुख्यमंत्री अर्थमंत्री आणि संस्कृती मंत्री यांनी यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.

कोल्हापूर प्रशांत दामले न्यूज
कोल्हापूर प्रशांत दामले न्यूज
author img

By

Published : Feb 11, 2021, 7:31 PM IST

कोल्हापूर - कोरोनानंतर राज्यातील नाट्यगृहांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. तसेच, कलाकारांचे आर्थिक प्रश्न समोर येत आहेत. अशा परिस्थितीत नाट्यगृहांचे महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने नाट्यगृहांसाठी दोनशे ते चारशे कोटींचा निधी एफडी म्हणून ठेवावा. त्याच्या व्याजावर राज्यातील नाट्यगृहांची देखभाल, दुरुस्ती होऊ शकते, अशी मागणी अभिनेते प्रशांत दामले यांनी केली आहे. आज ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

नाट्यगृहांच्या देखभालीसाठी 200 कोटींचा निधी एफडी करून ठेवावा - प्रशांत दामले

लग्नाची पुढची गोष्ट

कोरोनामुळे मार्च 2020 पासून लॉकडाउन डाऊन जाहीर झाले. त्यामुळे सर्व क्षेत्राप्रमाणे नाट्यसृष्टी सुद्धा बंद झाली. त्यामुळे प्रत्यक्ष नाटक पाहण्यापासून नाट्यरसिक वंचित राहिला होता. परंतु, आता राज्य शासनाने जाहीर केलेल्या अनलॉकनंतर पुन्हा नाट्यक्षेत्र नव्या जोमाने कामाला लागले आहे. त्याबाबत माहिती देण्यासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेले प्रशांत दामले आणि कविता लाड या जोडीचे एका लग्नाची पुढची गोष्ट हे सुपरहिट नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

नाटकाच्या निमित्ताने दामले यांचा महाराष्ट्र दौरा

नाटकाच्या निमित्ताने प्रशांत दामले यांनी प्रथमच पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. यासंदर्भात त्यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. दरम्यान, या संदर्भात पत्रकारांशी बोलताना अभिनेते दामले म्हणाले, 'कोरोनानंतर सरकारच्या सर्व नियमांनुसार आम्ही नाट्य प्रयोग सुरू केले आहेत. सध्या पश्चिम महाराष्ट्रात दौरा करत आहे. मात्र, राज्य सरकारने नाट्यगृहांच्या देखभाल दुरुस्तीसाठी कायमस्वरूपी 200 ते 400 कोटी रुपयांचा निधी हा एफडी स्वरूपात ठेवावा. म्हणजे त्याच्या व्याजावर राज्यातील नाट्यगृहांची देखभाल, दुरुस्ती होऊ शकते. त्यासाठी मुख्यमंत्री अर्थमंत्री आणि संस्कृती मंत्री यांनी यासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.