ETV Bharat / state

'गोकुळ याच मातीतल्या लोकांचा राहणार'; पालकमंत्री सतेज पाटलांना विश्वास

author img

By

Published : May 1, 2021, 1:33 PM IST

गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्या (२ मे) रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीच्या विरोधात पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने तगडे आव्हान उभे केले आहे.

Satej Patil on Gokul Dudh Sangh election victory
सतेज पाटील गोकुळ दूध संघ विजय विश्वास

कोल्हापूर - गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा अंतिम टप्पा आहे. गोकुळचे खासगीकरण होऊ नये यासाठी सभासद नक्कीच मतदान करतील. मी मतदान आणि निकालाची वाट पाहतो आहे. गोकुळ नक्कीच या मातीतल्या लोकांचा राहील, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा काँगेस कमिटीतर्फे महापालिका क्षेत्रातील लसीकरण केंद्रांमध्ये लस घेणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांच्या हस्ते हे पाण्याचे टँक जिल्हा काँग्रेस कमिटीला सुपूर्द करण्यात आले.

गोकुळ दूध संघात विजय मिळण्याचा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला

कायमच नागरिकांसाठी काम केले -

काँग्रेस पक्षाने आपल्या ध्येय धोरणानुसार सामान्यांना आधार देण्याचे कार्य नेहमीच केले आहे. सध्या सर्वत्र कोविड लसीकरण मोहीम राबवली जात आहे. कोल्हापूर महानगपालिका क्षेत्रात १२ लसीकरण केंद्रावर लसीकरण मोहीम राबवली जात आहे. आजपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. ही लसीकरण मोहीम पुढील सहा महिने चालणार आहे. लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीने लसीकरण केंद्रावर १५० पिण्याच्या पाण्याचे जार उपलब्ध करून दिले आहेत.

यावेळी काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, गुलाबराव घोरपडे, संजय पोवार-वाईकर, किशोर खानविलकर, महम्मद शेख, संपत पाटील, संध्या घोटने, वैशाली महाडिक, चंदा बेलेकर, उजवला चौगले, मतीन शेख, सचिन काटकर, किरण मेथे, डॉ. बुलबुले, मंगल खुडे, आर.के. देवणे, यशवंत थोरवत, संजय चिकूर्डेकर, बाबुराव कंबळे, राजेंद्र मोरे, पार्थ मुंडे, दीपक थोरात, अक्षय शेळके आदी उपस्थित होते.

गोकुळ याचं मातीतला राहणार -

गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उद्या (२ मे) रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीच्या विरोधात पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी आघाडीने तगडे आव्हान उभे केले आहे. आज गोकुळ निवडणुकीचा अंतिम टप्पा आहे. या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे नेते पालकमंत्री सतेज पाटील यांना या निवडणुकीतबाबत विचारले असता त्यांनी आम्हाला विश्वास आहे गोकुळचे सभासद हे जाणकार आहेत. गोकुळ खाजगी होऊ नये यासाठी ते नक्कीच आपल्या बाजूने मतदान करतील. उद्याच्या मतदान आणि निकालाची वाट पाहतोय. नक्कीच गोकुळ या मातीतल्या लोकांचा राहील, असा विश्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.