ETV Bharat / state

निवडून येऊन चूक केली म्हणून त्यांनी मतदारांचीच मागावी माफी; मंडलिकांचा खासदारांना टोला - alliance

लोकसभा निवडणुकीचे वारे आता सर्वत्र वेगाने वाहू लागले आहे. कोल्हापुरात सुद्धा युती आणि आघाडीकडून संपूर्ण मतदारसंघात दौरे सुरू आहेत. युतीच्या प्रचाराचा शुभारंभ २४ मार्चला कोल्हापूरातून होणार असल्याने त्याची तयारी सुरू आहे.

संजय मंडलिक
author img

By

Published : Mar 15, 2019, 1:50 PM IST

कोल्हापूर - माझ्यावर आरोप करण्यापेक्षा त्यांनी काय केले हे पाहिले पाहिजे. कालच विद्यमान खासदारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची माफी मागितली. त्यांनी मतदारांची माफी मागितली पाहिजे, की मी निवडून येऊन चूक केली आणि तुमचे कोणतेच प्रश्न मी सोडवू शकलो नाही. तरच त्या माफीला अर्थ असल्याची टीका कोल्हापूर मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार संजय मंडलिक यांनी खासदार धनंजय महाडिक यांना त्यांना लगावला.

संजय मंडलिक

लोकसभा निवडणुकीचे वारे आता सर्वत्र वेगाने वाहू लागले आहे. कोल्हापुरात सुद्धा युती आणि आघाडीकडून संपूर्ण मतदारसंघात दौरे सुरू आहेत. युतीच्या प्रचाराचा शुभारंभ २४ मार्चला कोल्हापूरातून होणार असल्याने त्याची तयारी सुरू आहे. तर आघाडीच्याही प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरातूनच होणार आहे. आघाडीकडून खासदार धनंजय महाडिक यांची पक्षाकडून नुकतीच उमेदवारी जाहीर झाली आहे तर शिवसेनेकडून संजय मंडलिक यांचे नाव अद्याप जाहीर झाले नसले तरी लवकरच होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. खासदार महाडिक यांनी वेळोवेळी मंडलिक यांना १२ वाजता उठतात अशा प्रकारचे आरोप केले. त्यावर उत्तर देताना मंडलिक यांनी महाडिक यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली ते म्हणाले, खासदार गुळगुळीत झालेले कॅसेट परत-परत लावत आहेत. 'खोटं बोल पण रेटून बोल' असे ते गेले अनेक दिवस झाले करत आहेत. खरंतर खासदारच आता 'नॉट रीचेबल' असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे माझ्यावर आरोप करण्यापेक्षा त्यांनी स्वतः काय केले हे पाहावे. ते म्हणाले, कालच खासदारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची माफी मागितली. पण त्यांनी त्यांची माफी न मागता मतदारांची माफी मागितली पाहिजे, की मी निवडून येऊन चूक केली आणि तुमचे कोणतेच प्रश्न मी सोडवू शकलो नाही. तरच त्या माफी मागण्याला अर्थ असल्याची टीका सुद्धा मंडलिक यांनी खासदारांवर केली.

Intro:कोल्हापूर - माझ्यावर आरोप करण्यापेक्षा त्यांनी काय केलं हे पाहिले पाहिजे. कालच विध्यमान खासदारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची माफी मागितली. पण त्यांनी त्यांची माफी न मागता मतदारांची माफी मागितली पाहिजे की मी निवडून येऊन चूक केली आणि तुमचे कोणतेच प्रश्न मी सोडवू शकलो नाही. तरच त्या माफी मागण्याला अर्थ असल्याची परखड टीका कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे संभाव्य उमेदवार संजय मंडलिक यांनी खासदार धनंजय महाडिक यांना त्यांचे नाव न घेता केली. ते आज पत्रकारांशी बोलत होते.Body:लोकसभा निवडणुकीचे वारे आता सर्वत्र वेगाने वाहू लागले आहे. कोल्हापुरात सुद्धा युती आणि आघाडीकडून संपूर्ण मतदारसंघात दौरे सुरू झाले आहेत. युतीच्या प्रचाराचा शुभारंभ येत्या २४ तारखेला कोल्हापूरातून होणार आहे. त्याची जय्यत तयारी सुद्धा सुरू आहे. तर आघाडीच्याही प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरातूनच होणार आहे. आघाडीकडून खासदार धनंजय महाडिक यांची पक्षाकडून नुकतीच उमेदवारी जाहीर झाली आहे तर शिवसेनेकडून संजय मंडलिक यांचे नाव अध्याप जाहीर झाले नसले तरी येत्या दोन दिवसात ते जाहीर होईल. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहेत. खासदार महाडिक यांनी वेळोवेळी मंडलिक यांना १२ वाजता उठतात अशा प्रकारचे आरोप केले. त्यावर उत्तर देताना मंडलिक यांनी महाडिक यांच्यावर त्यांचे नाव न घेता टीका केली ते म्हणाले, खासदार गुलगुळीत झालेले कॅसेट परत परत लावत आहेत. खोटं बोल पण रेटून बोल असे ते गेले अनेक दिवस झाले करत आहेत. खरंतर खासदारच आता 'नॉट रीचेबल' असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे माझ्यावर आरोप करण्यापेक्षा त्यांनी स्वतः काय केलं हे पाहावे. ते पुढे म्हणाले, कालच विध्यमान खासदारांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची माफी मागितली. पण त्यांनी त्यांची माफी न मागता मतदारांची माफी मागितली पाहिजे की मी निवडून येऊन चूक केली आणि तुमचे कोणतेच प्रश्न मी सोडवू शकलो नाही. तरच त्या माफी मागण्याला अर्थ असल्याची टीका सुद्धा मंडलिक यांनी खासदारांवर केली.
(हेडींग मध्ये बदल करू नये)

बाईट- संजय मंडलिक (शिवसेना)Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.