ETV Bharat / state

कोण कोणाचा पैरा फेडेल हे जनताच ठरवेल, समरजितसिंह घाटगे यांचा ग्रामविकास मंत्र्यांना इशारा - Minister hasan mushrif

योग्यवेळी समरजीत घाटगे यांचा पैरा फेडला जाईल, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देताच भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी मुश्रीफ यांचा चांगला समाचार घेतला आहे. ज्या गोष्टीची मला कल्पनाच नाही, त्यावरून माझ्यावर आरोप करण्यात आले. मात्र, कोण कोणाचा पैरा फेडेल हे जनताच ठरवेल. मी राजर्षी छत्रपती शाहूंच्या रक्ताचा वंशज आहे. असल्या गल्लीतल्या धमक्यांना मी घाबरत नाही, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दिला आहे.

म
author img

By

Published : Sep 13, 2021, 9:09 PM IST

Updated : Sep 13, 2021, 10:14 PM IST

कोल्हापूर - योग्यवेळी समरजीत घाटगे यांचा पैरा फेडला जाईल, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देताच भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी मुश्रीफ यांचा चांगला समाचार घेतला आहे. ज्या गोष्टीची मला कल्पनाच नाही, त्यावरून माझ्यावर आरोप करण्यात आले. मात्र, कोण कोणाचा पैरा फेडेल हे जनताच ठरवेल. मी राजर्षी छत्रपती शाहूंच्या रक्ताचा वंशज आहे. असल्या गल्लीतल्या धमक्यांना मी घाबरत नाही, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दिला आहे.

बोलताना समरजितसिंह घाटगे

भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत निशाणा साधला. त्यानंतर मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत कोल्हापूरचे भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. किरीट सोमैया यांना माहिती पुरवणारे घाटगे आणि चंद्रकांत पाटील आहेत, असा आरोप मुश्रीफ यांनी केला. त्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत या आरोपाला प्रत्युत्तर दिले.

किरीट सोमैया यांना मी एकदाही भेटलेलो नाही - घाटगे

भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाटगे म्हणाले, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे किरीट सोमैया यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्याऐवजी ते माझ्यावर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर बोलले. मुख्य मुद्द्यापासून लक्ष वळविण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. किरीट सोमैया यांना मी एकदाही भेटलेलो नाही. मग यामध्ये माझा कुठून संबंध आला. मला या गोष्टीची कल्पना देखील नाही, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - माझ्यावरील आरोप चुकीचे, सोमैयांवर 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा करणार - मंत्री मुश्रीफ

Last Updated : Sep 13, 2021, 10:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.