ETV Bharat / state

Rajarshi Shahu Maharaj : यंदापासून शाहू महाराजांच्या जयंतीचा नगारा वाजणार राधानगरी धरणावर - radhanagari dam in kolhapur

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती यंदापासून राधानगरी धरणावर साजरी करण्यात येणार आहे. शाहू जनक घराण्याचे वंशज समरजीतसिंह घाटगे यांनी याबाबत माहिती दिली आहे. या सोहळ्यात राधानगरी धरणाचे जलपूजन केले जाणार आहे. तसेच, शाहूंना जलाभिषेक घातला जाणार आहे. या कार्यक्रमात अठरापगड जातीच्या लोकांचा सहभाग असणार आहे. तसेच, या धरणासाठी जमिनी दिलेल्यांच्या वंशजांना आमंत्रित केले जाणार आहे.

shahu maharaj jayanti
shahu maharaj jayanti
author img

By

Published : Jun 21, 2021, 8:00 PM IST

Updated : Jun 21, 2021, 8:26 PM IST

कोल्हापूर - आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती दरवर्षी देशभरात 26 जून रोजी उत्साहात साजरी होत असते. मात्र, राजर्षी शाहूंची जयंती यंदापासून राधानगरी धरणावर साजरी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शाहू जनक घराण्याचे वंशज समरजीतसिंह घाटगे यांनी याबाबत कोल्हापुरात माहिती दिली आहे.

शाहू जनक घराण्याचे वंशज समरजीतसिंह घाटगे

धरणातील जलपूजन, महाराजांना जलाभिषेक

समरजीतसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतूनच शाहूंचे जीवंत स्मारक समजल्या जाणाऱ्या राधानगरी धरणावरून ही जयंती साजरी होणार आहे. यावेळी राधानगरी धरणातील पाण्याचे जलपूजन होणार आहे. याच पाण्याने शाहूंच्या पुतळ्याला जलाभिषेक करण्यात येणार आहे. अठरापगड जातीच्या लोकांचासुद्धा या कार्यक्रमात सहभाग असणार आहे. या संदर्भातच कशा पद्धतीने ही जयंती साजरी होणार आहे? याचे स्वरूप काय असणार आहे? याबाबतचा सविस्तर आढावा ईटीव्ही भारतने शाहू जनक घराण्याचे वंशज समरजीतसिंह घाटगे यांच्याशी बातचीत करून घेतला आहे.

राधानगरी धरण, राजर्षी शाहू महाराजांचे जिवंत स्मारक

राधानगरी धरण बांधून तब्बल 100 वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न ज्यांनी मार्गी लावला, त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती जिल्ह्यातच नाही तर देशभरात साजरी होते. मात्र, शाहू महाराज यांना ज्या कागलमधील घाटगे घरण्यातून दत्तक घेतले गेले, त्या घाटगे घराण्याचे वारसदार समरजितसिंह घाटगे यांनी यंदापासून राजर्षी शाहूंची जयंती राधानगरी धरणावरच साजरी करण्याचे ठरवले आहे. राधानगरी धरण म्हणजे शाहू महाराजांचे जिवंत स्मारक समजले जाते.

...तेव्हा धरणाचे दरवाजे उघडतात आपोआप

शाहू महाराजांनी हे धरण बांधून कोल्हापूर जिल्ह्याचा पाणीप्रश्न मिटवला. आजही या धरणाला 7 स्वयंचलित दरवाजे आहेत. जेव्हा धरण 100 टक्के भरते तेव्हा या धरणाचे दरवाजे आपोआप उघडले जातात. त्यामुळे या धरणाला अधिक महत्त्व प्राप्त होते. पाणी प्रश्नाबरोबरच शाहू महाराजांनी बहुजन समाजासाठी आपले आयुष्य वेचले, त्यांचे विविध प्रश्न सोडवले. एवढेच नव्हे तर सर्वात प्रथम बहुजन समाजाला आरक्षणही शाहू महाराजांनीच दिले. त्यामुळे शाहू महाराजांचे स्मरण करण्यासाठी त्यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी शाहू जनक घराण्याचे वंशज समरजीतसिंह घाटगे पुढे सरसावले आहेत. त्यानुसार, यंदापासून शाहू महाराजांची जयंती राधानगरी धरणावर साजरी करण्याचा निर्णय घाटगेंनी घेतला आहे.

अशी साजरी होईल यंदाची शाहू जयंती

येत्या 26 जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आहे. राजर्षी शाहू महाराजांचा कृतीशील वारसा जगासमोर घेऊन जाण्यासाठी शाहू महाराजांचा जन्मोत्सव यापुढे राधानगरी धरणावर साजरा केला जाणार आहे. दरवर्षी उत्साहात जयंती साजरी होते. यंदा शाहू महाराजांच्या कृतीचे प्रतीक असलेल्या राधानगरी धरणावर महाराजांची जयंती साजरी करण्यात येणार आहे.

जमिनी दिलेल्यांच्या वंशजांना असणार आमंत्रित

विशेष म्हणजे ज्यांनी या संपूर्ण धरणासाठी आपल्या जमिनी दिल्या, त्या नागरिकांच्या वारसांनाही याठिकाणी आमंत्रित करण्यात येणार आहे. अठरापगड जातीच्या लोकांचाही या सोहळ्यात सहभाग असणार आहे. या सर्वांच्या हस्ते राधानगरी धरणातील पाण्याचे पूजन करण्यात येणार आहे. धरणातील पाण्याने शाहू महाराजांच्या पुतळ्याला जलाभिषेक घालण्यात येणार आहे.

कोरोना संपल्यावर जल्लोषात साजरी होणार जयंती

यावेळी विविध कार्यक्रमही आयोजित करण्यात आले आहेत. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. तर कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहात येथे जयंती साजरी करण्यात येणार आहे.

हेही वाचा - Pawar Politics... शरद पवार- प्रशांत किशोर यांची दिल्लीत भेट, तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांसोबत उद्या दुपारी ४ वाजता बैठक

Last Updated : Jun 21, 2021, 8:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.