ETV Bharat / state

गावठी बॉम्बच्या अफवेने जयसिंगपूरमध्ये खळबळ - Kolhapur District Latest News

शहरातील कोल्हापूर - सांगली महामार्गावरील पायोस हॉस्पिटलमध्ये गावठी बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने खळबळ उडाली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, या बॉम्बसदृश्य वस्तूची पाहाणी केली. ही वस्तू बॉम्ब नसून, दहशत पसरवण्याच्या उद्देशाने कोणीतरी हे साहित्य इथे ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

गावठी बॉम्बच्या अफवेने खळबळ
गावठी बॉम्बच्या अफवेने खळबळ
author img

By

Published : Mar 21, 2021, 6:29 PM IST

जयसिंगपूर ( कोल्हापूर) - शहरातील कोल्हापूर - सांगली महामार्गावरील पायोस हॉस्पिटलमध्ये गावठी बॉम्ब असल्याची अफवा पसरल्याने खळबळ उडाली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, या बॉम्बसदृश्य वस्तूची पाहाणी केली. ही वस्तू बॉम्ब नसून, दहशत पसरवण्याच्या उद्देशाने कोणीतरी हे साहित्य इथे ठेवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

जयसिंगपूरमध्ये सांगली - कोल्हापूर मार्गावर डॉ.सतिश पाटील यांचे पायोस हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटल परिसरात गुरुवारपासून बेवारस अवस्थेत प्लॅस्टिकच्या पोत्यामध्ये काही साहित्य पडले होते. हे साहित्य रुग्णांच्या नातेवाईकांचे असेल म्हणून सुरक्षा रक्षकाने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र रविवारी सकाळी याच रुग्णालयातील एक कर्मचारी भरत पाटील यांना त्या पोत्यातून टीक-टीक असा आवाज आला. तेव्हा त्यांनी हे पोते तपासले असता, पोत्यामध्ये त्यांना प्लॅस्टिकचे पाईप, वायर आणि एक इलेक्ट्रॉनिक सर्किट आढळून आले. तर पोत्यामधून बाहेर काढलेली एक केबल देखील आढळली. त्यांनी याची माहिती डॉ. सतिश पाटील यांना दिली.

गावठी बॉम्बच्या अफवेने खळबळ

गावठी बॉम्ब असल्याची अफवा

दरम्यान डॉ. सतिश पाटील यांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर, घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोध व नाशक पथक, पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले. बॉम्ब शोध व नाशक पथकाने घटनास्थळी जाऊन या पोत्याची पाहणी केली असता, त्यांना त्यामध्ये एक वायर व काही प्लॅस्टिकचे पाईप आढळून आले. दरम्यान या साहित्याची तपासणी केली असता ती वस्तू गावठी बॉम्ब नसल्याचे समोर आले आहे. कोणीतरी दहशत पसरवण्याच्या उद्देशाने हा खोडसाळपणा केल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा - भाजपची महाविकास आघाडी बरखास्त करण्याची मागणी हास्यास्पद - जयंत पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.