ETV Bharat / state

Road Built After Independence: स्वातंत्र्यानंतर कोल्हापूरातील 'या' गावांत पहिल्यांदाच बनला रस्ता - Road Built In Kolhapur Villages

कोल्हापुरातल्या राधानगरी तालुक्यातील ( Radhanagari Taluka in Kolhapur ) कामतेवाडी हे या तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले गाव. 3 ते 4 गावांची मिळून इथं ग्रामपंचायत आहे. निसर्गसौंदर्याने नटलेला हा संपूर्ण परिसर स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा अनेक सुविधांपासून वंचित आहे. मात्र स्वातंत्र्यांनंतर पहिल्यांदाच या गावांना जगासोबत जोडणारा डांबरी रस्ता बनला ( Road Built After Independence In Kamtewadi ) आहे. त्यामुळे नागरिक सुद्धा आनंदात आहेत.

Road built for the first time१
गावांत पहिल्यांदाच बनला रस्ता
author img

By

Published : Jul 29, 2022, 5:07 PM IST

Updated : Jul 29, 2022, 6:02 PM IST

कोल्हापूर - कोल्हापुरातल्या राधानगरी तालुक्यातील ( Radhanagari Taluka in Kolhapur ) कामतेवाडी हे या तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले गाव. 3 ते 4 गावांची मिळून इथं ग्रामपंचायत आहे. हा संपूर्ण परिसर वाकीघोल परिसर म्हणून ओळखला जातो. निसर्गसौंदर्याने नटलेला हा संपूर्ण परिसर स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर सुद्धा अनेक सुविधांपासून वंचित आहे. मात्र स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच या गावांना जगासोबत जोडणारा डांबरी रस्ता बनला ( Road Built After Independence In Kamtewadi ) आहे. त्यामुळे नागरिक सुद्धा आनंदात आहेत. शिवाय खऱ्या अर्थाने आज स्वातंत्र्य मिळाले असे वाटत असल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.

वाकीघोल परिसर आणि इथली परिस्थिती - कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्गसौंदर्याने नटलेला सर्वांत सुंदर परिसर म्हटले की राधानगरी हेच नाव डोळ्यासमोर येते. याच राधानगरीमध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. जिथे दरवर्षी अनेक पर्यटक भेट देत असतात. वाकीघोल परिसर सुद्धा यापैकी एक आहे. जवळपास 14 वाड्या- वस्त्या या वाकीघोलमध्ये आहेत ( There are 14 villages in this Vakighol ). खरंतर या गावांना डांबरी रस्त्याच्या माध्यमातून दळणवळणाच्या मुख्य प्रवाहात आणायला स्वातंत्र्यानंतरही 75 वर्षे लागली. नुकतेच या मतदारसंघातील आमदारांच्या पाठपुराव्यामुळे बागलवाडी, हेळेवाडी आणि सर्वात शेवटचे टोक असलेल्या कामतेवाडीमध्ये चांगल्या दर्जाचा रस्ता झाला आहे. एसटी सेवा सुद्धा सुरू आहे. गारगोटी आणि राधानगरी या दोन ठिकाणी एसटी सेवा सुरू आहे. मात्र अजूनही अनेक सुविधांपासून वंचित असल्याचे गावकरी सांगतात. शिवाय गावात रस्ता झाला असला तरी तालुक्याला जाण्यासाठी अजूनही पक्का डांबरी रस्ता झाला नसल्याचे गावकऱ्यांनी म्हटले आहे.

गावांत पहिल्यांदाच बनला रस्ता

'या' आहेत समस्या - गावात सुंदर रस्ता झाला मात्र तालुक्याला जोडणारा रस्ताही होण्याची गरज आहे. वनविभागाने सुद्धा यामधून समस्येतून मार्ग काढावा अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे. आरोग्य सुविधा गरजेच्या आहेत. आपत्कालीन परिस्थितीत कोणतीही सुविधा नाही. मोबाईल नेटवर्क पासून अजूनही वंचित असलेला हा परिसर आहे. डोंगरातील उंच ठिकाणी जाऊन मोबाईलचे नेटवर्क मिळवावे लागते. इतर कोणत्याही कंपनीचे नेटवर्क इथे नाही. केवळ बीएसएनएलचेच नेटवर्क मिळते. एखाद्याच्या घरात कोणी दगावला किंवा काहीही संकट कोसळले तर नातेवाईकांना निरोप सुद्धा पोहोचत नाही, इतका दुर्गम परिसर आहे.

Road signs
रस्ते मार्गांचे फलक

परिसरातील पर्यटन स्थळे - या वाकीघोलमध्ये राहणारे रहिवासी वाकीघोल ग्रामविकास संस्थेचे उपाध्यक्ष राजु ढोकरे तसेच ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब कामते यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात अनेक पर्यटनस्थळे आहेत. यामध्ये दुधगंगा धरण जे काळममावाडी धरण आहे ते पाहता येते. बॅकवॉटर, वाकोबा देवालय, काळम्मादेवी व काळम्मादेवी धबधबा, रवळनाथ देवालय, तोरस्करवाडी धबधबा (बाहुबली), रक्षादेवी मंदिर, जिंजी निवास याठिकाणी जाता येते. याच जिंजी निवासमध्ये जेव्हा छत्रपती राजाराम महाराज या भागात येत होते तेंव्हा त्यांचे वास्तव्य असायचे असेही राजू ढोकरे यांनी म्हटले. या भागात पर्यटक आले पाहिजे पण त्यांनी स्वतःची काळजी स्वतः घेणे गरजेचे आहे. कारण परिसरात कोणतीही आरोग्यसुविधा नाही. तसेच पर्यटक वाढीमुळे व्यवसायवाढीत सुद्धा नक्कीच फरक पडला आहे आणि आमच्या दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी एक उपजीविकेचे साधन बनणार आहे असेही ते सांगतात.

Road built for the first time
गावांत पहिल्यांदाच बनला रस्ता

हेही वाचा - Shinde Govt Cabinet Expansion: प्रबळ दावेदारांमुळे अडले मंत्रिमंडळ विस्ताराचे घोडे; शिंदे सरकारची वाढली डोकेदुखी

Last Updated : Jul 29, 2022, 6:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.