ETV Bharat / state

कोरोची माळावर तरुणाची गळा आवळून हत्या, ओळख लपवण्यासाठी डोक्यावर गंभीर घाव

कोरोची माळावर अज्ञात मारेकऱ्यांनी एका तरुणाचा गळा आवळून आणि डोक्यात सीमेंटचा खांब मारुन खून केल्याची घटना घडली आहे. हातकणंगले- इचलकरंजी रस्त्यावर मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली.

Rickshaw driver strangled to death
रिक्षाचालक तरुणाचा खून
author img

By

Published : Feb 24, 2021, 1:41 PM IST

कोल्हापूर - कोरोची माळावर अज्ञात मारेकऱ्यांनी एका तरुणाचा गळा आवळून आणि डोक्यात सीमेंटचा खांब मारुन खून केल्याची घटना घडली आहे. हातकणंगले- इचलकरंजी रस्त्यावर मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. शुभम उमेश कमलाकर या २१ वर्षांचा तरुणाचा खून करण्यात आला आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेल नाही.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक असलेला शुभम कमलाकर हा अविवाहित होता. तो रिक्षाचालवायचा आणि वेल्डिंगच्या दुकानात कामालाही जात होता. मंगळवारी काम आटोपल्यानंतर तो मित्रांसोबत कोरोची येथील माळावर गेला होता. यावेळी त्याने मित्रांसोबत मद्यप्राशन केले. मद्यप्राशनानंतर त्यांच्यात वाद निर्माण होऊन शुभमच्या डोक्यात सीमेंटचा खांब घालून आणि दोरीने गळा आवळून खून केला असावा, असा पोलिसानी संशय व्यक्त केला आहे. त्याची ओळख पटू नये यासाठी मारेकऱ्यांनी त्याच्या चेहऱ्यावर सीमेंट खांबाचे घाव घालून चेहऱ्याचा

चेंदामेंदा केला होता. रात्री उशिरापर्यंत माहिती घेण्याचे काम सरू होते. घटनास्थळी दोरी, सीमेंटचा खांब, नशा करण्यासाठी वापरले जाणारे बाँड पोलिसांना सापडले. श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञ पथक पाचारण करण्यात आले होते. श्वानपथकाकडून शोध मोहीम राबविली जात आहे. मात्र, अंधारामुळे अडथळे येत होते. श्वानपथकाला घटनास्थळी रुमाल, ए.टी.एम. कार्ड सापडले आहे

हद्दीवरून हातकणंगले- शहापूर पोलिसांत वाद

शुभमचा खून हातकणंगले- इचलकरंजी मार्गानजीक असलेल्या कोरोची माळावर झाला. त्यामुळे नेमकी हद्द शहापूरची की, हातकणंगलेची यावरून वाद सुरू झाला. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी झाडाझडती करुन हातकणंगले पोलिसांना या गुन्ह्याचे सोपस्कार पूर्ण करण्याचे आदेश दिले.

याच ठिकाणी दहावर्षांपूर्वी खून

कोरोची माळ हा ओसाड असून या ठिकाणी नेहमी नशेबाज तरुणांचा वावर असतो. ओपन बार, गांजा यासह इतर व्यसनाधीन यांचा या माळावर नेहमीच वावर असतो. शुभम कमलाकरचा खून झालेल्या ठिकाणी दहा वर्षापूर्वी हातकणंगले येथील राजू पाटीलचा खून झाला होता.

इचलकरंजीतील माफियांना वेसण घालणार का?

वस्त्रनगरी आणि महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजी शहराची आता ओळख पुसली जात असून गुन्हेगारांचे शहर म्हणून ओळखले जात आहे. महिन्याभरपूर्वी कबनुर येथे एका तरुणाचा खून झाला होता. वारंवार अशा घटना येथे घडत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासन इचलकरंजीतील माफियांना वेसण घालणार का, असा सवाल उपस्थित होत आहे?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.