ETV Bharat / state

कोल्हापूर लोकसभा : संजय मंडलिकांच्या धनुष्याला काँग्रेसच्या पाटलांचा 'हात'? धनंजय महाडिकांसमोर मोठे आव्हान - shivsena

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येथून आघाडीकडून राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक हे तर युतीकडून शिवसेनेचे संजय मंडलिक रिंगणात आहेत.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ
author img

By

Published : Apr 8, 2019, 10:07 AM IST

Updated : Apr 8, 2019, 3:14 PM IST

कोल्हापूर - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातली निवडणूक ही सध्या आरोप-प्रत्यारोपांनी गाजत आहे. या मतदारसंघात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. येथून आघाडीकडून राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक हे तर युतीकडून शिवसेनेचे संजय मंडलिक रिंगणात आहेत. २०१४ च्या निवडणुकीत धनंजय महाडिकांना सहकार्य करणारे काँग्रेसचे आमदार सतेज पाटीलांनी यावेळी त्यांच्या विरोधात भूमिक घेतली आहे. तर चंद्रकांत पाटील यांनीही मंडलीक यांच्या विजयासाठी ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे ही लढत रंगतदार होण्याची चिन्ह दिसत आहेत.

मतदारसंघाची पार्श्वभूमी

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात १९९८ पासून २०१४ पर्यंत सदाशिवराव मंडलिक यांचे वर्चस्व राहिले आहे. १९९८ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते कोल्हापूर मतदारसंघातून विजयी झाले होते. सलग ३ वेळा ते राष्ट्रवादी काँग्रेसकडून संसदेवर निवडून गेले होते. २००९ च्या निवडणुकीवेळी मंडलिक यांचे शरद पवार यांच्याशी मतभेद झाले आणि लोकसभेची चौथी निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढविली. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारत २०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची उमेदवारी मागितली. ती न मिळाल्याने त्यांनी पक्षावर तोफ डागली. त्यानंतर सुपुत्र संजय मंडलिक यांनी शिवसेनेत प्रवेश करून ही निवडणूक लढविली. पण यामध्ये राष्ट्रवादीतून तिकीट मिळालेले धनंजय महाडिक ३३ हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ

सतेज पाटलांची भूमिका महत्वाची

आत्ताची निवडणूकसुद्धा धनंजय महाडिक आणि संजय मंडलीक या दोघांमध्येच होत आहे. गतवेळी महाडिक यांना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा पाठिंबा होता. पण तेच सतेज पाटील आता खासदार महाडिक यांच्या विरोधात असून विधानसभेला विश्वासघात केल्याचा आरोप करत आहेत. यावेळी महाडीकांना मदत करणार नसल्याचे सतेज पाटल यांनी सांगितले आहे. त्यामुळे या निवडणुकीत अधिक चुरस निर्माण झाली आहे.

अद्याप तरी या मतदारसंघात कोणाच्या बाजूने कौल लागणार हे स्पष्ट होत नाही. विशेष म्हणजे मंडलिक यांच्या प्रचारात महाडिकांचे जवळचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सहभाग मंडलीक कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवणारा आहे. महाडीक यांच्याशी मैत्री असली तरी युतीधर्मानुसार मंडलीक यांना खासदार करणार असे चंद्रकांत पाटील यांनी आश्वासन दिल्याने मंडलिकांना मोठा आधार मिळाला आहे.

काही दिवसांपूर्वी महाडिक यांच्या उमेदवरीवर नाराज असलेले राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ हे आता महाडिक यांना निवडून आणण्याचा स्पष्टपणे निर्वाळा देत आहेत. या सगळ्या धामधुमीत पुतण्याला संसदेत पाठवण्यासाठी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी भाजपच्या कोषातून बाहेर पडून गाठीभेटी सुरु केल्या आहेत. यावेळी जर निवडून नाही दिले तर आमचे राजकारण संपेल असे भाकीत माहदेव महाडिक यांनी केले आहे.

अमल आणि शौमिका महाडिक यांची भूमिका

महादेवराव महाडीक जरी स्वतः बाहेर पडून प्रचार करत असले तरी त्यांचे पुत्र भाजपचे आमदार अमल आणि सुनबाई जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक हेही घरातल्या उमेदवाराच्या प्रचारात उतरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर खासदार महाडीक आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यात नव्याने युद्ध सुरु झाल्याने आघाडीत विघ्न निर्माण झाले आहे. त्यामुळे धनंजय महाडिक यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. पण मी केलेल्या कामावरच लोक मला पुन्हा निवडून देतील असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांना आहे.

गेल्या ५ वर्षात कोणतेच प्रश्न सोडवू शकलो नाही म्हणून खासदार महाडिक यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे असे संजय मंडलिक यांनी म्हटले आहे.

मतदारसंघातील प्रश्न

पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न, शहरातील शिवाजी पुलाचा प्रश्न, महत्वाचा प्रश्न कोल्हापूरमध्ये उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे म्हणून गेल्या ३५ वर्षापासून लढा सुरु आहे. तो अद्यापही सुरु आहे. आंदोलने झाली आहेत. तरीही तो प्रश्न सुटलेला नाही.

धनंजय महाडिक यांनी आजपर्यंत सोयीचे राजकारण केले आहे. त्यांचे भाजपसोबत सुद्धा जवळचे संबंध आहेत. त्यामुळे भाजपच्या जवळीकतेचा त्यांना फायदा होणार की तोटा हा येणारा काळच ठरवेल असे राजकीय विश्लेषकांनी म्हटले आहे.

या मतदारसंघात ६ विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो. यामध्ये शिवसेनेचे ३ आमदार आहेत. राष्ट्रवादीचे २ तर भाजपचे एका जागेवर वर्चस्व आहे. त्यामुळे पक्षीय बलाचा विचार केला तर युतीची ताकद जास्त असल्याचे दिसते आहे.

पक्षीय बलाबल

करवीर विधानसभा मतदारसंघ - चंद्रदीप नरके (शिवसेना)
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ - राजेश क्षिरसागर (शिवसेना)
राधानगरी विधानसभा मतदारसंघ - प्रकाश आबीटकर (शिवसेना)
चंदगड विधानसभा मतदारसंघ - संध्यादेवी कुपेकर (राष्ट्रवादी)
कागल विधानसभा मतदारसंघ - हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी)
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ - अमल महाडिक (भाजप)

एकदंरच सर्व राजकीय समीकरणे बघितली तर धनंजय महाडीक आणि संजय मंडलीक यांच्यातील लढत ही अत्यंत तुल्यबळ आहे. युतीची ताकद जास्त असली तरी अंतर्गत गटबाजीचा फटका मंडलीकांना बसू शकतो. तर आघाडीतील मतभेद अद्यापही मिटले नसल्यामुळे काँग्रेसकडून धनंजय महाडीकांना मदत होईल का? यावर प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे कोल्हापूरकर आगामी खासदार कोणाला करणार हा येणारा काळच ठरवेल.

Intro:Body:

कोल्हापूर लोकसभा : संजय मंडलिकांच्या धनुष्याला काँग्रेसच्या पाटलांचा 'हात'? धनंजय महाडिकांसमोर मोठे आव्हान

Conclusion:
Last Updated : Apr 8, 2019, 3:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.