ETV Bharat / state

कोल्हा'पुरा'तील जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात; शाळांना १६ ऑगस्टपर्यंत सुट्टी - कोल्हापूर

कोल्हापुरातील पाणी पातळीत घट झाल्याने जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.

पूरग्रस्तांना मदत करताना
author img

By

Published : Aug 13, 2019, 4:03 PM IST

कोल्हापूर - पाणी पातळीत घट झाल्याने सातारा-कागलपर्यंत बंद असलेला राष्ट्रीय महामार्ग ४ वर वाहतूक सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे शहरामध्ये २ लाख ७० हजार लिटर पेट्रोल, २ लाख ४० हजार लिटर डिझेल तर १४ हजार गॅस सिलेंडर शहरामध्ये दाखल झाले आहेत. अनेक मार्ग बंद होते ते सुरू होत आहेत. त्यामुळे आता पूरस्थितीमुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.

माहिती देताना जिल्हाधिकारी दौलत देसाई

एसटी वाहतूक सुरु

महामार्ग खुला झाल्याने साध्या बसगाड्यांसोबत, परिवर्तन, शिवनेरी या राज्य परिवहन विभागाच्या ताफ्यातील गाड्याही शहरामध्ये दाखल झाल्या आहेत. कोल्हापूरमधून पुणे, मुंबई, बेळगाव एसटी वाहतूक आज सुरु झाली. कोल्हापूर ते गगनबावडा, कोल्हापूर ते मलकापूरमार्गे रत्नागिरी हे दोन मार्ग अद्यापही बंद आहेत. अंबोलीपर्यंत वाहतूक सुरु आहे. परंतु, पुढे बंद आहे. तसेच जयसिंगपूरपर्यंत वाहतूक सुरु असून पुढे बंद आहे.

शाळांना सुट्ट्या

शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी, पन्हाळा पश्चिम भाग, शहर व इतर तालुक्यातील गंभीर पूरस्थिती ठिकाणच्या परिसरातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना १३ ते १६ ऑगस्टपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे.

शहरामध्ये होत आहे जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा

पुरामुळे निर्माण झालेला कचरा निर्मुलन, विघटन करणे, मृत जनावरांच्या शरीराची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. आजपासून शिबिरातील पूरग्रस्तांना प्रती व्यक्ती प्रतीदिन ६० रुपये व लहान मुलांना ४५ रुपये याप्रमाणे एक आठवड्याची रोख रक्कम देण्यात येणार आहे. सानुग्रह अनुदान म्हणून ग्रामीण भागातील पूरगस्तांना १० हजार रुपये, शहरी भागातील कुटुंबांना १५ हजार रुपये देण्यात येणार आहे. यापैकी ५ हजार रुपये रोख स्वरुपात वाटण्याची कार्यवाही आजपासून सुरु होणार आहे. ज्या ठिकाणचे पाणी ओसरले आहे त्या गावचे पंचनामे करण्याची कार्यवाही देखील सुरु करण्यात येत आहे.

मदत स्वीकारण्यासाठी शिरोली आणि अंबप फाटा येथे मदत केंद्र

जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मदतीचा मोठा ओघ सुरु झाला आहे. ही मदत स्वीकारण्यासाठी शिरोली एमआयडीसी प्लॉट क्रमांक १ येथे स्वीकारण्यात येत आहे. येथील संपर्क क्रमांक ९०७५७४८३६१, दुसरे मदत केंद्र अंबप फाटा ८८५६८०१७०६ या क्रमांकावर स्वयंसेवी संघटनांनी मदत देण्यासाठी संपर्क करावा. ही मदत प्रशासनामार्फत पूरग्रस्तांना वितरीत करण्यात येणार आहे.

विमा कंपन्यांना पत्र

नैसर्गिक आपत्तीत जिल्ह्यातील वेगवेगळ्या स्तरावर प्रचंड नुकसान झाले आहे. सर्व विमा कंपन्यांनी सर्वच कागदपत्रांचा पाठपुरावा न करता विमा नियामक आणि विकास प्राधिकरणच्या निर्देशानुसार १५ दिवसात आपले दावे निकाली लावावेत. याबाबत कोणतीही तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी, असे पत्रही सर्व विमा कंपन्यांना आज देण्यात आले आहे.

शिरोळ तालुक्यात आत्तापर्यंत २४ टन अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

शिरोळ तालुक्यामध्ये आज अखेर सुमारे २४ टन अन्न आणि जीवनावश्यक वस्तुंचे वाटप हेलिकॉप्टरच्या माध्यमातून करण्यात आले आहे. शिरोळ तालुक्यातील पाणी पातळीमध्ये घट होत आहे. लवकरच येथेही जनजीवन पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.

Intro:अँकर : पाणी पातळीत झपाट्याने घट झाल्याने सातारा-कागल पर्यंत बंद असलेला राष्ट्रीय महामार्ग 4 वर वाहतूक सुरु करण्यात आली. त्यामुळे शहरामध्ये 2 लाख 70 हजार लिटर पेट्रोल, 2 लाख 40 हजार लिटर डिझेल तर 14 हजार सिलेंडर शहरामध्ये दाखल झाले आहे. अनेक मार्ग बंद होते ते सुरू होत आहेत. त्यामुळे आता पूरपरिस्थितीमुळे विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली आहे.
Body:*एसटी वाहतूक सुरु*

महामार्ग खुला झाल्याने परिवर्तन, शिवनेरी या राज्य परिवहन विभागाच्या ताफ्यातील गाड्याही शहरामध्ये दाखल झाल्या आहेत. कोल्हापूरमधून पुणे, मुंबई, बेळगाव एसटी वाहतूक आज सुरु झाली. कोल्हापूर ते गगनबावडा, कोल्हापूर-मलकापूरमार्गे रत्नागिरी हे दोन मार्ग अद्यापही बंद आहेत. अंबोलीपर्यंत वाहतूक सुरु आहे परंतु पुढे बंद आहे. तसेच जयसिंगपूरपर्यंत वाहतूक सुरु असून पुढे बंद आहे.

*शाळांना सुट्ट्या*

शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी, पन्हाळा पश्चिम भाग, शहर व इतर तालुक्यातील गंभीर पूरस्थिती ठिकाणच्या परिसरातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना 13 ते 16 अखेर सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

*जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा शहरामध्ये होत आहे.*

पुरामुळे निर्माण झालेला कचरा निर्मुलन, विघटन करणे, मृत जनावरांच्या शरीराची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावणे यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. आजपासून शिबीरातील पूरग्रस्तांना प्रती व्यक्ती प्रतीदिन 60 रुपये व लहान मुलांना 45 रुपये अशी एक आठवड्याची रोख रक्कम देण्यात येणार आहे. सानुग्रह अनुदान म्हणून ग्रामीण भागातील पूरगस्तांना 10 हजार रुपये, शहरी भागातील कुटुंबांना 15 हजार रुपये देय आहे यापैकी 5 हजार रुपये रोख स्वरुपात वाटण्याची कार्यवाही आजपासून सुरु होणार आहे. ज्या ज्या ठिकाणी पाणी ओसरले आहे त्या गावचे पंचनामे करण्याची कार्यवाही देखील सुरु करण्यात येत आहे.

*मदत स्वीकारण्यासाठी शिरोली आणि अंबप फाटा येथे मदत केंद्र*

जनजीवन पूर्वपदावर येत आहे. मदतीचा मोठा ओघ सुरु झाला आहे. ही मदत स्वीकारण्यासाठी शिरोली एमआयडीसी प्लॉट क्रमांक 1 येथे स्वीकारण्यात येत आहे. येथील संपर्क क्रमांक 9075748361. दुसरे मदत केंद्र अंबप फाटा 8856801708 या क्रमांकावर स्वयंसेवी संघटनांनी मदत देण्यासाठी संपर्क करावा. ही मदत प्रशासनामार्फत पूरग्रस्तांना वितरीत करण्यात येणार आहे.

*विमा कंपन्यांना पत्र*

नैसर्गिक आपत्तीत जिल्ह्यातील वेगवेगळ्या स्तरावर प्रचंड नुकसान झाले आहे. सर्व विमा कंपन्यांनी सर्वच कागदपत्रांचा पाठपुरावा न करता विमा नियामक आणि विकास प्राधिकरणच्या निर्देशानुसार 15 दिवसात आपले दावे निर्गत करावेत, याबाबत कोणतीही तक्रार येणार नाही याची दक्षता घ्यावी, असे पत्रही सर्व विमा कंपन्यांना आज देण्यात आले आहे.

*शिरोळ तालुक्यात आत्तापर्यंत 24 टन अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप*

शिरोळ तालुक्यामध्ये आज अखेर सुमारे 24 टन अन्न आणि जीवनावश्यक वस्तुंचे वाटप हेलिकॉप्टरच्या माध्यमातून करण्यात आले आहे. शिरोळ तालुक्यातील पाणी पातळीमध्ये घट होत आहे. लवकरच येथेही जनजीवन पूर्वपदावर येईल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे. Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.