ETV Bharat / state

मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्यासाठी खांद्याला खांदा लावून लढण्याची आमची तयारी : आमदार हसन मुश्रीफ

कर्नाटकविरोधात ( border dispute ) खांद्याला खांदा लावून लढण्यास आम्ही तयार असल्याचे आमदार हसन मुश्रीफ ( MLA Hasan Mushrif ) म्हणाले. महाजन आयोगाने चुकीचा ( Mahajan Commission ) अहवाल दिलाने सीमावाद ( Maharashtra Karnataka border dispute ) वाढत असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला आहे.

MLA Hasan Mushrif
आमदार हसन मुश्रीफ
author img

By

Published : Dec 4, 2022, 4:18 PM IST

कोल्हापूर - राज्यात ओला दुष्काळ ( wet drought ) जाहीर करावा या प्रमुख मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी 19 डिसेंबरला नागपूरला विराट मोर्चा काढणार असल्याची माहिती राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ ( MLA Hasan Mushrif ) यांनी दिली आहे. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. दरम्यान महाजन आयोगाने ( Mahajan Commission ) चुकीचा अहवाल दिला असल्याे सीमावाद ( Maharashtra Karnataka border dispute ) वाढत असल्याचं आरोप मुश्रीफ यांनी केला.

कर्नाटक वादावर लढण्याची आमची तयारी - तसेच मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्यासाठी खांद्याला खांदा लावून लढण्याची आमची तयारी असल्याचे ते म्हणाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री हे मराठी माणसाला डिवचण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना कर्नाटकात जाण्यासाठी रोखलं तर, आम्हीही त्यांच्यासोबत जाऊ असेही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. तसंच उदयनराजे यांच्या भूमिकेचे स्वागत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्यामागे उभा आहे असे त्यांनी म्हटले आहे.

लोकसभा उमेदवारीबाबत चर्चा - कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत विचारले असता मुश्रीफ म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची संख्या वाढत आहे. अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत. अलीकडेच चेतन नरके यांच्या उमेदवारीची चर्चा झाली. अरुण नरके यांचे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांशी संबंध आहेत. त्यामुळे ते भेटू शकतात. उद्योजक व्ही. बी. पाटील हे देखील लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यासपीठावर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी लावलेली हजेरी चर्चेचा विषय बनली होती. यासंदर्भात मुश्रीफ यांना विचारले असता, त्यांनी ए. वाय. पाटील आज आमच्यासोबत दिसतात ना? ते आमच्यासोबत आहेत म्हणजे राष्ट्रवादीतच आहेत, असे सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.