ETV Bharat / state

हातकणंगले लोकसभा : राजू शेट्टी पराभूत, धैर्यशील मानेंनी 1 लाख मतांनी मिळवला विजय - Shetkari sanghatana

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्यामुळे चर्चेत असलेल्या हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी जवळपास 1 लाख मतांनी विजय मिळवला.

राजू शेट्टी आणि धैर्यशील माने
author img

By

Published : May 23, 2019, 6:04 AM IST

Updated : May 23, 2019, 6:38 PM IST

चुरशीच्या लढतीत राजू शेट्टींवर केली धैर्यशील मानेंनी मात
हातकणंगले लोकसभा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांच्यामुळे राज्यभरात चर्चेत होता. गेल्यावेळी महायुतीच्या वतीने निवडणूक लढवून शेट्टी हे दुसऱ्यांदा लोकसभेत पोहोचले होते. महायुतीच्या तंबूतून बाहेर पडून शेट्टी यांनी महाघाडीशी जवळीक साधून निवडणूक लढवली यावेळी त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले युवा नेते धैर्यशील माने होते. प्रारंभी या लढतीत राजु शेट्टी हे सहजपणे बाजी मरतील असे चित्र होते पण अखेरच्या टप्प्यात त्याला टोकाची कलाटणी मिळाली. माने यांच्यादृष्टिने अनेक घटक पथ्यावर पडली. माने यांची मराठा जात त्यावरून केलेला बहुजन समाजाच्या अस्मितेचा मुद्दा शेट्टी आणि साखर कारखानदारांशी साधलेली जवळीक आणि नवमतदारांना माने यांना दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे माने यांची बाजू अधिकाधिक भक्कम होत गेली त्याचा प्रत्यय आज मतमोजनीवेळी आला.
येथील राजाराम तलावाजवळील शासकीय गोदामात मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला पहिल्या फेरीचा निकाल शेट्टी यांना दिलासा देणारा ठरला. या फेरीत शेट्टी यांना 104 मतांची अल्पशी आघाडी मिळाली किंबहुना हीच त्यांची एकमेव आघाडी देणारी फेरी ठरली सलामीच्या फेरीत शेट्टी यांना 35 हजार 567 तर माने यांना 35 हजार 463 मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या अस्लम सय्यद यांनी 6984 मते घेऊन आपला प्रभाव दाखवून दिला. दुसरी फेरी मात्र शेट्टी यांना धक्का देणारी होती. त्यांना 30 हजार 623 मते मिळाली. तर माने यांनी 33 हजार 820 मते मिळवून मताधिक्य खेचले. दुसऱ्या फेरीअखेर 3 हजारांहून अधिक मताधिक्य मिळविले. त्यांचा प्रत्येक फेरीला मताधिक्य वाढतच राहिले. पाचव्या फेरीवेळी माने यांना 1 लाख 80 हजार तर शेट्टी यांना 1 लाख 45 हजार मते मिळाली होती. 35 हजारांचे मताधिक्य घेतले. हाच क्रम उत्तोरोत्तर वाढत राहिला.

त्यांनतर माने यांनी विजयाच्या दिशेने कुच केल्याचे स्पष्ट जाणवले. निकालानंतर धैर्यशील माने यांनी युवा जनतेने युवा नेतृत्वाला विजयी करून आपल्या मनातील खासदार बनविण्याचे मूर्तिमंत उदाहरण घालून दिले आहे. माझ्या विजयाला सहाय्यभूत ठरलेल्या तरुणांसह समस्थ मतदारांच्या ऋणात मी आयुष्यभर राहीन. याचवेळी उत्तम लोकप्रतिनिधी कसा असतो हे कृतीतून दाखवून देईन सांगत मानेंनी शेट्टी यांच्यावर टीकेची तोफ डागली. ते म्हणाले, जनतेला गृहीत धरण्याचा त्यांचा निर्णय चुकला चूकीच्या मार्गाने जाणाऱ्या लोकप्रतिनिधींची कोणती अवस्था होते हे निकालातून मतदारांनीच दाखवून दिले आहे.

४.३० - धैर्यशील माने यांना ४३१८४८ मते मिळाली असून राजू शेट्टी यांना ३४५७९५ मते मिळाली आहेत.

२.३० - राजू शेट्टींच्या मतदान संख्येत वाढ होताना दिसत नाही. ९ व्या फेरी अखेरीस धैर्यशील माने यांना ७२ हजाराची आघाडी

१.३० - धैर्यशील मानेंनी घेतली ५५ हजारांची आघाडी

१२.४५ - राजू शेट्टी पिछाडीवर, धैर्यशील मानेंनी घेतली ४२ हजारांची आघाडी

बहुजन वंचित आघाडीच्या अस्लम सय्यद यांना लक्षणीय मते मिळाली असून शेट्टींना याच गोष्टीचा फटका बसताना दिसतोय.

११.४० - ७ व्या फेरी अखेर धैर्यशील मानेंना १९६७८७ मते, १९,६७८ हजार मतांनी राजू शेट्टी पिछाडीवर आहेत.

११.०० तिसऱ्या फेरी अखेर धैर्यशील माने यांची १३३३० मतांची आघाडी

९.५५ - धैर्यशील माने ३०३९ मतांनी आघाडीवर

९.१५ - धैर्यशील माने आघाडीवर

८.३० - स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आघाडीवर

८.०० - प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात
७.४५ - उमेद्वारांचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रात दाखल
७.३० - मतमोजणी केंद्र परिसरात मोबाईल जामर कार्यान्वित
७.०० - मतमोजणी अधिकारी व कर्मचारी मतमोजणी केंद्रावर दाखल. तयारी पूर्ण

कोल्हापूर - हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी विरुध्द शिवसेनेचे धैर्यशील माने अशी येथे लढत होत आहे. दोन वेळा लोकसभेत निवडून गेलेले शेट्टी यावेळी विजयाची हॅट्रीक साधणार की नवखे धैर्यशील माने त्यांची विकेट घेऊन दिल्ली गाठणार याचा निकाल आज लागेल. थोड्याच वेळात इथल्या मतमोजणीला सुरुवात होत आहे.

२००९ आणि २०१४ या २ लोकसभा निवडणुकीत अनुक्रमे निवेदिता माने आणि कल्लापा आवाडे यांना पराभूत करून, राजू शेट्टींनी संसदेवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा झेंडा फडकवला आणि काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावला. त्यामुळे यावेळी शेट्टींविरोधात काँग्रेसचा उमेदवार कोण असणार यावरून चर्चा सुरू होती. मात्र, राजू शेट्टी यांनी भाजपचा पाठिंबा काढून घेतल्यापासून राजकीयदृष्टया ते काँग्रेसच्या जवळ आले. त्यामुळे आघाडीने शेट्टींसाठी हातकणंगले आणि सांगली मतदारसंघ अशा २ जागा सोडल्या. या दोन्ही मतदारसंघामध्ये आजदेखील शेट्टी यांचा मोठा प्रभाव असल्याचे पाहायला मिळत आहे.

विरोधकांकडून मात्र शेट्टी हे विकासाची कामे करण्यात अपयशी ठरल्याची टीका केली जाते. मतदारसंघात शेतीच्या बरोबरीने औद्योगिक विस्तार मोठा आहे, पण उद्योग आणि उद्योजकांना शेट्टी यांनी वाऱ्यावर सोडल्याचा त्यांच्यावर आरोप केला जातो. हातकणंगले मतदार संघात एकूण १७ लाख ७२ हजार ५६३ मतदार आहेत. यावेळी १२ लाख ४५ हजार ७९७ मतदारांनी मतदान केले आहे. यावेळी या मतदारसंघात ७३ टक्के मतदान झाले.

राजू शेट्टी यांनी अनेक आंदोलने करत ती यशस्वीही करुन दाखवली आहेत. त्यांना लोकांचा मोठा पाठिंबा आपल्या मागे उभा केला. पण शिवसेनेच्या धैर्यशील माने यांचे मोठे आव्हान शेट्टीसमोर असणार असून गेल्या वेळच्या निवडणुकीप्रमाणे शेट्टींना ही निवडणूक सोपी नसणार असे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे. अद्याप राजू शेट्टी यांचे पारडे किंचित जड वाटत असले तरी धैर्यशील मानेंचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.

Intro:Body:

ENT 04

Conclusion:
Last Updated : May 23, 2019, 6:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.