ETV Bharat / state

राजू शेट्टींनी उडवली निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्याची खिल्ली म्हणाले, "मोदी हे ओला आणि शहा हे उबर" - ola

तरुण पिढी ओला व उबरचा वापर करत असल्याने वाहन उद्योगावर परिणाम झाल्याचे वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले होते. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनीसुद्धा त्यांच्या या वक्तव्यावर ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत खिल्ली उडवली आहे.

ट्विट
author img

By

Published : Sep 10, 2019, 11:44 PM IST

Updated : Sep 11, 2019, 8:35 AM IST

कोल्हापूर - ओला आणि उबरमुळे देशातील वाहन व्यवसायात मंदी आली असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटल्यानंतर त्यांच्या या वक्तव्याची अनेकांनी खिल्ली उडवली आहे.

तरुण पिढी ओला व उबरचा वापर करत असल्याने वाहन उद्योगावर परिणाम झाल्याचे वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले होते. यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनीसुद्धा त्यांच्या या वक्तव्यावर ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत सीतारामन यांच्या मते मोदी हे ओला आणि उबर हे शहा असल्यामुळे त्यांचे हे वक्तव्य बरोबर असल्याचे म्हणत शेट्टींनी त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.

हेही वाचा - 'तरुण पिढी ओला व उबेरचा वापर करत असल्याने वाहन उद्योगावर परिणाम'

मोदी व शहा या ओला-उबेरच्या धोरणामुळेच देश मंदीच्या संकटात सापडला असल्याची टीका देखील शेट्टी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या या वक्तव्यामुळे त्यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली जात आहे.

Intro:अँकर : ओला आणि ऊबेर मुळे देशातील वाहन व्यवसायात मंदी आली असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हंटल्यानंतर त्यांच्या या वक्तव्याची अनेकांनी खिल्ली उडवली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुद्धा त्यांच्या या वक्तव्यावर आपली ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया देत सितारामन यांच्या मते मोदी हे ओला आणि उबेर हे शहा असल्यामुळे त्यांचे हे वक्तव्य बरोबर असल्याचे म्हणत त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. मोदी व शहा या ओला-उबेरांच्या धोरणामुळेच देश मंदीच्या संकटात सापडला असल्याची टीका सुद्धा राजू शेट्टी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली. दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या या वक्तव्यामुळे त्यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात खिल्ली उडवली जाऊ लागली आहे.

Tweeter link
https://twitter.com/rajushetti/status/1171470410606505984?s=19Body:.Conclusion:.
Last Updated : Sep 11, 2019, 8:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.