कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी 'महाराष्ट्र बंद'च्या हाकेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या बंदमध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा-'आईनेच दिला मराठीचा पहिला धडा'; फ्रान्सिस दिब्रिटो यांची विशेष मुलाखत
ठाकरे सरकारने शेतकाऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीने सातबारा कोरा होणार नाही. त्यामुळे सातबारा कोरा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी बंदमध्ये सहभागी होऊन हा बंद यशस्वी करण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आले आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काल (मंगळवारी) सायंकाळी जिल्ह्यातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये घोषणा देत बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन केले.