ETV Bharat / state

एकरकमी एफआरपीबाबत राजू शेट्टी पुन्हा आक्रमक, म्हणाले रणसंग्राम जवळच आहे - Raju Shetty aggressive

ऊस दर नियंत्रण समितीच्या सुत्रांमध्ये बदल करायचा असेल तर ती केवळ संसदेलाच करावी लागेल. तो अधिकार कोणत्याही राज्यांना दिलेला नाही. मात्र असे असताना महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने यामध्ये बदल केले आहेत. या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात जाऊन त्यांचा हा डाव हाणून पाडू, असेही शेट्टी म्हणाले.

राजू शेट्टी
राजू शेट्टी
author img

By

Published : Feb 22, 2022, 8:44 AM IST

कोल्हापूर - महाविकास आघाडी सरकार व कारखानदारांच्या दरोडेखोर टोळक्यांमध्ये हिम्मत असेल तर पुढच्या वर्षी दोन टप्यात एफआरपी देऊन कारखाने चालू करून दाखवा. गाठ आमच्याशी आहे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे. राज्य शासनाने नुकतेच ऊस दराबाबत एक आदेश काढला आहे. त्यामध्ये अप्रत्यक्षपणे एफआरपीचे दोन तुकडे होणार आहेत. त्यांच्या या आदेशानंतर शेट्टी आक्रमक झाले असून त्यांनी सरकारला हा इशारा दिला आहे.

एकरकमी एफआरपीबाबत राजू शेट्टी पुन्हा आक्रमक

ऊस दर नियंत्रण समितीच्या सुत्रांमध्ये बदल करायचा असेल तर ती केवळ संसदेलाच करावी लागेल. तो अधिकार कोणत्याही राज्यांना दिलेला नाही. मात्र असे असताना महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने यामध्ये बदल केले आहेत. या निर्णयाविरोधात आम्ही न्यायालयात जाऊन त्यांचा हा डाव हाणून पाडू, असेही शेट्टी म्हणाले.

दरोडेखोरांचे टोळके एकत्र -

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून दरोडेखोरांचे टोळके एकत्र आले आहे. या टोळक्याने जर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरावर दरोडा टाकायचा निर्णय केला असेल तर कायदा हातात घेऊन त्यांना हे मागे घ्यायला लावू. यावर्षी आम्ही एकरकमी एफआरपी घेतली आहेच. शिवाय कारखानदार आणि सरकारमध्ये हिम्मत असेल तर पुढच्या वर्षी दोन तुकड्यांमध्ये एफआरपी देऊन दाखवा. रणसंग्राम जवळच आहे, असा इशारा सुद्धा शेट्टी यांनी यावेळी दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.