कोल्हापूर - 'भगवान के घर देर है मगर अंधेर नही है' हेच आज सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीतून दिसून येत आहे, अशी प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली आहे. कृषी कायद्यांच्या विरोधातील याचिकेवर आज (सोमवार) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यामध्ये न्यायालयाने केंद्र सरकारला धारेवर धरत आपण कृषी कायद्यांना स्थगिती देऊ शकत नसाल तर आम्ही देऊ, असे म्हटले आहे.
सरकार केवळ चर्चेचे नाटक करत होते
मागील काही दिवासांपासून देशातील शेतकरी कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन करत आहेत. कायदे रद्द झाल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे. मात्र, हे कायदे रद्द न करण्याच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार केवळ चर्चेचे नाटक शेतकाऱ्यांसोबत करत आले. अनेक चर्चा निष्फळ ठरल्या. केवळ शेतकऱ्यांना आशा पद्धतीने त्रास देऊन वेळकाढूपणा करत होते. म्हणूनच न्यायालयाने केंद्र सरकारला झापले असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - 'संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह लिहिणाऱ्या गोळवलकरांचे पुस्तक आधी जाळा'
हेही वाचा - कोल्हापुरातील रुग्णालयातील 'फायर ऑडिट' करा - उपमुख्यमंत्री