ETV Bharat / state

'हिंमत असेल तर केंद्र सरकार विरोधात आंदोलन करा' - भाजपच्या आंदोलनावर राजू शेट्टींची प्रतिक्रिया

भाजप आणि मित्र पक्षांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले होते. दरम्यान, या आंदोलनात शेतकरी संघटनांसह भाजप आणि मित्र पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून ठिकठिकाणी निदर्शने सुरू आहेत. पश्चिम महाराष्ट्रात या आंदोलनाचा मोठा परिणाम दिसत असून कोल्हापूर जिल्ह्यात देखील आंदोलनाला सुरवात झाली आहे. याच आंदोलनावर स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी टीका केली आहे.

राजू शेट्टी
राजू शेट्टी
author img

By

Published : Aug 1, 2020, 7:56 PM IST

कोल्हापूर - 'आमचं आंदोलन हे राज्य आणि केंद्र सरकार विरोधातील होतं, मात्र भाजपची केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्याची हिंमत नाही', अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाजप आणि मित्रपक्षांनी दूध दरवाढीच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनावर केली आहे. सोबतच हिंमत असेल तर केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्याचं आव्हान देखील त्यांनी केलं आहे.

भाजपच्या आंदोलनावर राजू शेट्टींची प्रतिक्रिया

दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुध दर वाढवून मिळावा, यामागणीसह राज्य सरकारने अनुदान द्यावे, या मागणीसाठी भाजप आणि मित्र पक्षांच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले होते. दरम्यान, या आंदोलनात शेतकरी संघटनांसह भाजप आणि मित्र पक्षांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून ठिकठिकाणी निदर्शने सुरू आहेत. पश्चिम महाराष्ट्रात या आंदोलनाचा मोठा परिणाम दिसत असून कोल्हापूर जिल्ह्यात देखील आंदोलनाला सुरवात झाली आहे. याच आंदोलनावर स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी टीका केली आहे.

राजू शेट्टी म्हणाले, 'भाजप आणि सहयोगी पक्षांचे आंदोलन हे राजकीय आंदोलन होतं, हिंमत असेल तर केंद्र सरकार विरोधात आंदोलन करा. सोबतच 'भाजपनं दूध पावडर आयात बंदीची मागणी केंद्राकडे करावी' अशी मागणी देखील त्यांनी केली. शेतकऱ्यांबद्दल यांना कळवळा नसून हे राजकीय आंदोलन असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

'राजू शेट्टी म्हणजे गावात सोडलेला वळू' - सदाभाऊ खोत

'राजू शेट्टी हे आता काजू शेट्टी झाले असून या भंपक माणसाला आता कोणी किंमत देत नाही, तसेच त्यांची अवस्था आता गावात देवाला सोडलेल्या वळू प्रमाणे झालेली आहे. त्यामुळे आता काय करावे आणि काय नाही, हे सूचत नसल्याने राजू शेट्टी यांनी दूध दराच्या आंदोलनाचे नाटक केले आहे'. असा आरोप माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी लिंक उघडा: राजू शेट्टी म्हणजे गावात सोडलेला वळू; सदाभाऊ खोतांचा जोरदार पलटवार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.