ETV Bharat / state

सरकारने केलेली कर्जमाफी नेमकी कोणासाठी? राजू शेट्टींचा सवाल

राज्य सरकारने शेतकऱ्यांना केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी नाराज आहेत. ठाकरे सरकारने केलेली कर्जमाफी नेमकी कोणासाठी? असा सवाल शेट्टींनी उपस्थित केलाय. ही कर्जमाफी 7 ते 8 हजार कोटींपेक्षा जास्त नसेल असेही शेट्टी यांनी म्हटले आहे.

Raju shetti comment on loan waiver in kolhapur
राजू शेट्टींचा सरकारला सवाल
author img

By

Published : Dec 26, 2019, 4:18 PM IST

Updated : Dec 26, 2019, 4:43 PM IST

कोल्हापूर - राज्य सरकारने शेतकऱ्यांना केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयावर शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी नाराज आहेत. ठाकरे सरकारने केलेली कर्जमाफी नेमकी कोणासाठी? असा सवाल शेट्टींनी उपस्थित केलाय. ही कर्जमाफी 7 ते 8 हजार कोटींपेक्षा जास्त नसेल असेही शेट्टी यांनी म्हटले आहे.

फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पण त्याला अनेक अनावश्यक अटी घातल्या होत्या. पण ठाकरे सरकारने जी कर्जमाफी केली ती दीड ऐवजी दोन लाखांपर्यंत केली. या सरकारने कोणत्याही अनावश्यक अटी आणि कागदपत्रांची आवश्यकता नसल्याचे जाहीर केल्यामुळे त्यांचे स्वागत असल्याचे शेट्टी म्हणाले. पण ज्या शेतकऱ्याला खरंच कर्जमाफीची गरज आहे, त्याला मात्र या जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा होत नसल्याचे शेट्टी म्हणाले.

सरकारने केलेली कर्जमाफी नेमकी कोणासाठी?

उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कर्जमुक्त करून सात बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. पण सद्या महापुर, अतिवृष्टी आणि दुष्काळाने शेतकऱ्यांचे पीक अक्षरशः नष्ट झाले आहे. त्या शेतकऱ्यांना सद्या मदतीची गरज आहे. शेतकऱ्यांनी यावर्षीच्या महापुरात आणि दुष्काळात ज्या पिकांचे नुकसान झाले आहे, त्या पिकांसाठी कर्ज काढले आहे. ते कर्ज थकीत झाले नसल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा काहीच फायदा होणार नसल्याचेही शेट्टी म्हणाले. त्यामुळे जे शेतकरी थकीतमध्ये नसतील त्यांना सुद्धा या कर्जमाफीचा फायदा मिळायला पाहिजे अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे.

Intro:अँकर : राज्य सरकारने केलेल्या कर्जमाफीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने जी कर्जमाफी जाहीर केली आहे ती नेमकी कोणासाठी असा सवाल सुद्धा शेट्टींनी केला आहे. शिवाय ही कर्जमाफी 7 ते 8 हजार कोटींपेक्षा जास्त नसेल असेही शेट्टींनी म्हंटले आहे. फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पण त्याला अनेक अनावश्यक अटी घातल्या होत्या. पण ठाकरे सरकारने जी कर्जमाफी केली ती दीड ऐवजी दोन लाखांपर्यंत केली, शिवाय याला कोणत्याही अनावश्यक अटी आणि कागदपत्रांची आवश्यकता नसल्याचे जाहीर केले याचे स्वागत सुद्धा शेट्टींनी केले. पण ज्या शेतकऱ्याला खरंच कर्जमाफीची गरज आहे त्याला मात्र या जाहीर केलेल्या कर्जमाफीचा फायदा होत नाहीये. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून सात बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. पण सद्या महापुर, अतिवृष्टी आणि दुष्काळाने शेतकऱ्यांचे पीक अक्षरशः नष्ट झाले आहे त्या शेतकऱ्यांना सद्या मदतीची गरज आहे. शेतकऱ्यांनी यावर्षीच्या महापुरात आणि दुष्काळात ज्या पिकांचे नुकसान झाले आहे त्या पिकांसाठी कर्ज काढले आहे. ते कर्ज थकीत झाले नसल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा काहीच फायदा होणार नसल्याचेही शेट्टी यांनी म्हंटल आहे. त्यामुळे जे शेतकरी थकीत मध्ये नसतील त्यांना सुद्धा या कर्जमाफीचा फायदा मिळायला पाहिजे अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे. Body:.Conclusion:.
Last Updated : Dec 26, 2019, 4:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.