कोल्हापूर - "जर हवा असेल सात बारा कोरा तर उद्या महाराष्ट्र बंद करा" म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. शिवाय शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी केले आहे. उद्यासाठी (8 जानेवारी) महाराष्ट्र बंदची हाक त्यांनी दिली आहे.
हेही वाचा - 'सत्ता गेल्याने देवेंद्र फडणवीस यांचे संतुलन बिघडले आहे'
शेट्टी म्हणाले, "ठाकरे सरकारने शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीने सात बारा कोरा होणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेच्या सरकारने शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी ही तकलादू आहे. केवळ मोजक्याच शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे."
जे नियमित कर्ज परतफेड करतात आणि ज्यांना खरच कर्जमाफीची गरज आहे त्यांना सरकारने केलेल्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे सात बारा कोरा करण्याच्या प्रमुख मागणीसाठी उद्याच्या बंदमध्ये सहभागी होऊन हा बंद यशस्वी करण्याचे आवाहन शेट्टींनी केले आहे.
हेही वाचा - 'हे फसवं सरकार, वरपासून खालपर्यंत सगळेच खोटारडे', अनुराग कश्यप भडकला