कोल्हापूर - खासदार विनायक राऊत यांनी शुक्रवारी कोल्हापूरात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात माजी आमदार राजेश क्षीरसागर ( Rajesh Kshirsagar ) यांच्यावर केलेल्या जेवणाच्या बिलाची टीका ही राजेश क्षीरसागर समर्थकांच्या जिव्हारी लागली असल्याचे पाहायला मिळत आहे. आज राजेश क्षीरसागर समर्थकांकडून खासदार विनायक राऊत यांच्या या टीकेला जोरदार प्रतिउत्तर देण्यात आले आहे.
विनायक राऊतांच्या बॅनरवर बिल - छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्यावेळी आयोजित मेजवानीचे राजेश क्षीरसागर यांनी खर्च केलेल्या जेवणाचे बिल स्पीड पोस्टने विनायक राऊत यांना पाठवून राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. यावेळी क्षीरसागर समर्थकांकडून ( Rajesh Kshirsagar Supporter ) भल्या मोठ्या बॅनरवर थेट त्या मेजवानीचे बिल छापत हा घ्या पुरावा म्हणत विनायक राऊत म्हणजे खोट बोल पण रेटून बोल असल्याचे म्हटले आहे.
क्षीरसागरानी खर्च केलेल्या जेवणाचे बिल पाठवले राऊतांना - शुक्रवारी केशवराव भोसले नाट्यगृहात ( Keshavrao Bhosle Theatre ) झालेल्या शिवसैनिकांच्या मेळाव्यात बोलताना खासदार विनायक राऊत यांनी क्षीरसागर यांनी त्यांच्या निवासस्थानी दिलेल्या जेवणाचे पैसे हे तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांच्याकडून घेतले असल्याचे खळबळजनक वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा समाचार म्हणून क्षीरसागर गटाच्यावतीने त्यावेळी आयोजित मेजवानीचे राजेश क्षीरसागर यांनी खर्च केलेल्या जेवणाचे बिल स्पीड पोस्टने विनायक राऊत यांना पाठवला.
अन्नदाताचा राऊत यांनी अपमान केला - यावेळी बोलताना राजेश क्षीरसागर यांचे सुपुत्र ऋतुराज क्षीरसागर म्हणाले, गेली 36 वर्षे राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना पक्षासाठी अर्पण केले. खासदार विनायक राऊत यांनी इतक्या खालच्या पातळीला जाऊन वक्तव्य करणे हे निषेधार्ह असून घरी येणाऱ्या गृहस्थाचे आदरातिथ्य करणाऱ्या अन्नदाताचा राऊत यांनी अपमान केला असल्याचे सांगितले. या आंदोलनात युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, जयवंत हरुगले, तुकाराम साळोखे, अश्विन शेळके, कपिल सरनाईक, मंदार तपकिरे,अ विनाश कमते, दादू शिंदे, रणजित जाधव, मंगलताई साळोखे, पूजा भोर, मंगल कुलकर्णी, गौरी माळदकर, सुनीता भोपळे, उदय भोसले, सचिन क्षीरसागर ,अनिकेत राऊत, अंकुश निपाणीकर, आकाश सांगावकर, किरण पाटील, कपिल नाळे, शैलेंद्र गवळी, कृष्णा लोंढे, अर्जुन आंबी, विनोद हजारे, सुनील माने, रियाज बागवान आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा - Singapore Open 2022 : फुलराणीचा नवा विक्रम; सिंधूने पहिल्यांदाच पटकावले सिंगापूर ओपनचे जेतेपद