ETV Bharat / state

कोल्हापूर : नेमबाज राही सरनोबतचे घरच्यांकडून स्वागत - rahi sarnobat welcomes by her family kolhapur

कोल्हापूरची सुवर्णकन्या असलेल्या राही सरनोबतने यापूर्वी अनेक स्पर्धेत दमदार कामगिरी केली असून 100 हुन अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्थरावर पदक मिळविले आहेत. नुकत्याच क्रोएशिया येथे पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत राहीने 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक व 10 मीटर सांघिकमध्ये रौप्यपदक मिळवून कोल्हापूरचे नाव देशात आणि जगभरात केले होते.

rahi sarnobat welcomes by her family at home kolhapur after returning from tokyo olympic
नेमबाज राही सरनोबतचे घरच्यांकडून स्वागत
author img

By

Published : Aug 4, 2021, 12:55 PM IST

कोल्हापूर - टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेऊन परत आलेल्या कोल्हापुरातील नेमबाज राही सरनोबतचे तिच्या घरच्यांकडून स्वागत करण्यात आले. क्रोएशिया येथील विश्वचषकात 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक व 10 मीटर सांघिकमध्ये रौप्यपदक मिळवल्यानंतर राहीकडून अनेकांच्या अपेक्षा तसेच विश्वाससुद्धा होता. मात्र, निराशाजनक कामगिरीमुळे यामध्ये यश आले नसल्याचे राहीने म्हटले आहे. दरम्यान, मंगळवारी राही कोल्हापूरात आपल्या घरी परतली. यावेळी घरच्यांनीसुद्धा नाराजी व्यक्त न करता अगदी औक्षण करून राहीचे स्वागत केले.

ऑलम्पिकपूर्वी क्रोएशिया येथील विश्वचषकात दमदार कामगिरी -

कोल्हापूरची सुवर्णकन्या असलेल्या राही सरनोबतने यापूर्वी अनेक स्पर्धेत दमदार कामगिरी केली असून 100 हुन अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्थरावर पदक मिळविले आहेत. नुकत्याच क्रोएशिया येथे पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत राहीने 25 मीटर स्पोर्ट्स पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक व 10 मीटर सांघिकमध्ये रौप्यपदक मिळवून कोल्हापूरचे नाव देशात आणि जगभरात केले होते. त्यानंतर राहीने लगेचच ऑलिम्पिक स्पर्धेत प्रतिनिधित्व केले होते. ऑलिम्पिकमध्ये निराशाजनक कामगिरीमुळे राहीला माघारी यावे लागले. मात्र, ऑलम्पिकमध्ये प्रतिनिधित्व केल्यामुळे तसेच क्रोएशिया येथील विश्वचषकात केलेल्या सुवर्ण कामगिरीमुळे तीचे घरच्यांनी जोरदार स्वागत केले. शिवाय फुलांच्या पायघड्या घालून औक्षण करून राहीचे स्वागत केले.

Tokyo Olympic : सॅल्युट! मुलींनीच देशाला जिंकून दिली पदकं

भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 127 खेळाडूंचा मोठा संघ पाठवला आहे. परंतु भारताला आतापर्यंत फक्त तीन पदकं जिंकता आली आहेत. विशेष म्हणजे, हे तिन्ही पदकं महिला खेळाडूंनी जिंकली आहेत. यात मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये रौप्य तर पी. व्ही. सिंधू आणि बॉक्सर लवलिना बोर्गोहेन यांनी कांस्य पदकांची कमाई केली आहे.

मीराबाई चानू -

वेटलिफ्टर मीराबाई चानूने भारताला दुसऱ्याच दिवशी पदक जिंकून दिलं. मीराबाई चानूने 49 किलो वजनी गटात एकूण 202 किलो वजन उचलत रौप्य पदक जिंकले. मीराबाईने स्नॅचमध्ये 87 तर क्लीन अॅण्ड जर्कमध्ये 115 किलो वजन उचलले. या गटात चीनची झीहुई हाउने एकूण 210 किलो वजन उचलत सुवर्ण पदक जिंकले. तर इंडोनिशायाची विंडी केटिका आयशाह 194 किलो वजन उचलत कांस्य पदकाची विजेती ठरली.

पी. व्ही. सिंधू -

पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरे पदक जिंकून दिले. महिला एकेरीत सिंधूने कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात विजय मिळवला. या सामन्यात सिंधूने चीनच्या बिंग जिआओ हिला 21-13, 21-15 असे नमवलं. दरम्यान, पी. व्ही. सिंधूला उपांत्य फेरीत चीनच्या ताय झू यिंगकडून पराभव पत्कारावा लागला होता. यामुळे तिचे सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले होते. सिंधूला टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. सिंधू ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू ठरली.

लवलिना बोर्गोहेन -

भारतीय महिला बॉक्सिंगपटू लवलिना बोर्गोहेन हिचे 69 वजनी गटात सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले आहे. उपांत्य फेरीत लवलिनाचा तुर्कस्थानच्या बुसेनाझ सुर्मेनेली हिने पराभव केला. या पराभवामुळे लवलिनाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. दरम्यान, हे भारताचे तिसरे पदक आहे.

हेही वाचा - स्वांतत्र्यदिनाचा लाल किल्ल्यावरील कार्यक्रम असणार खास, मोदींनी दिलं खास पाहुण्यांना आमंत्रण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.