कोल्हापूर - पृथ्वीराज चव्हाण यांनी येथील पूरग्रस्त भागाला भेट दिली. शासनाकडून पूरग्रस्त भागातील लोकांना मदत केली जात आहे, मात्र, याठिकाणी एक राजकीय नेतृत्व दाखवायला पाहिजे होते ते दाखवलं गेलं नाही, हे दुर्दैव असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले.
याठिकाणच्या भागातील लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना शासनाकडून मदत मिळेल. मात्र, पूर ओसरल्यानंतर येथे साफसफाईचे माठे आव्हान आहे. याचे व्यवस्थापन करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक कमी पडत आहेत. त्यामुळे आमच्या भागातील काहींची तात्पुरती नेमणूक केली जाईल. मात्र, ज्याप्रकारे राजकीय नेतृत्व येथे हवं होतं ते झालं नाही, हे दुर्दैव आहे असा त्यांनी सरकारवर टोला लगावला.