कोल्हापूर : या शिक्षकाच्या डोक्यावर स्लॅबचा काही भाग (School Roof Collapsed) पडल्याने त्याला त्वरित कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात हलविण्यात आले. (School Roof Collapsed on teacher head) त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. सुभाष पाटील असे जखमी शिक्षकाचे नाव आहे. (Teacher injured in roof collapse)
प्राथमिक शाळांचा प्रश्न गंभीर : गुडेमधील ही शाळा ज्या ठिकाणी आहे त्या वाघवे-गुडे ग्रुप ग्रामपंचायतीकडून या नवीन बांधकामाच्या छताला गळती लागली होती. काही दिवसांपूर्वी छतावर पत्राही घालण्यात आला होता. मात्र, मागील दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कमकुवत झालेला काही भाग शिक्षकाच्या डोक्यावर कोसळला. सुदैवाने ज्या ठिकाणी स्लॅब कोसळला त्या ठिकाणी विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला.
वर्षभरापूर्वी एका शाळेचे छत कोसळले : एक ते दीड वर्षांपूर्वीच याच वाघवे-गुडे ग्रुप ग्रामपंचायत असलेल्या वाघवे प्राथमिक शाळेचे छत कोसळले होते. त्यावेळीसुद्धा सकाळची शाळा असल्याने मुले शाळेतून बाहेर पडली आणि त्यानंतर ही घटना घडली. त्यामुळे त्यावेळी सुद्धा एक मोठा अनर्थ टळला होता. याच धोकादायक शाळेत आजही मुले शिक्षण घेत आहेत. दरम्यान, वाघवे गावातील या धोकादायक शाळेचे निर्लेखन झाले आहे. शिवाय शाळेची इमारत पाडण्याचे काम देखील सुरू आहे. शाळेच्या तीनच खोल्या पाडण्यात आल्या असून उर्वरित धोकादायक इमारतीत अद्यापही विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही गंभीर बाबसुद्धा आजच्या या घटनेने समोर आली आहे. लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेत्यांचे याकडे दुर्लक्ष असून पालकांची सुद्धा अनास्था आहे. दरम्यान, शिक्षणमंत्री दीपक केसरकरसुद्धा याच जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. मात्र ते ज्या जिल्ह्याचे पालक आहेत त्याच जिल्ह्यात प्राथमिक शाळांची ही अवस्था असल्याचे समोर आले आहे.
12 वाड्या 13 वे गाव अशी गावाची ओळख: 12 वाड्या आणि 13 वे गाव अशी ओळख असलेल्या वाघवे-गुडे ग्रुप ग्रामपंचायत मध्ये एकूण वाघवे, मानेवाडी, कुराडवाडी, सुर्वेवाडी, उदाळवाडी, मुडेकरवाडी आणि गुडे अशा एकूण सात प्राथमिक शाळा आहेत. त्यापैकीच गुडे प्राथमिक शाळेतल्या छताचा काही भाग कोसळला आहे. शिवाय मुख्य वाघवे गावातल्या शाळेचा मुद्दा सुद्धा गंभीर आहे. त्याकडे सुद्धा आता गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. शालेय शिक्षकमंत्री दीपक केसरकर हे स्वतः या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांच्याच जिल्ह्यामध्ये ही घटना घडल्याने त्यांच्याकडून या गावातील शाळेसाठी निधी मिळावा, अशी अपेक्षासुद्धा या घटनेच्या निमित्ताने पालकांनी व्यक्त केली आहे.