ETV Bharat / state

Pranav Bhopale: कोल्हापूरातील फ्रीस्टाईल फुटबॉलर प्रणवचा आणखी एक जागतिक विक्रम ! - world Record In kolhapur Football

कोल्हापूर जिल्ह्यातल्या वडनगे गावातील फ्रीस्टाईल फुटबॉलर प्रणव अशोक भोपळे याने आणखी एका जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. त्याच्या नावावर हा तिसरा जागतिक विक्रम नोंदविला गेला असून या नोंदीचे प्रमाणपत्र प्रणवला नुकतेच प्राप्त झाले आहे. हातावरून छातीवर गोल आकारामध्ये फुटबॉल फिरविण्यात त्याने हा विक्रम केला असून त्याचा आजपर्यंतचा हा तिसरा विक्रम ठरला आहे. त्याच्या या नव्या विक्रमानंतर अनेकांकडून त्याचे कौतुक होत आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याच्या या विक्रमाची नोंद झाली आहे.

pranav bhopale world record
फुटबॉलर प्रणवचा आणखी एक जागतिक विक्रम
author img

By

Published : Feb 27, 2023, 11:55 AM IST

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विक्रमाची नोंद

कोल्हापूर : बांगलादेशच्या महमुदुल हसन फैसल याच्या नावावर या जागतिक विक्रमाची नोंद होती. त्याने एका मिनिटामध्ये 134 वेळा हातावरून छातीवर गोल आकारामध्ये फुटबॉल फिरवला होता. प्रणव भोपळे याने एका मिनिटामध्ये 146 वेळा हातावरून छातीवर गोल आकारामध्ये फुटबॉल फिरवून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. या रेकॉर्डचे प्रात्यक्षिक त्याने 25 डिसेंबर 2022 रोजी दिले होते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार अधिकृत साक्षीदार म्हणून क्रिडा शिक्षक रविंद्र पाटील यांनी, तसेच टाईमकिपर म्हणून वडणगे फुटबॉल क्लबचे कोच अशोक चौगले यांनी काम पाहिले.

दोन वर्षांपासून सुरू होता सराव : प्रणव गेल्या दोन वर्षांपासून हा विक्रम मोडण्याचा सराव करत होता. त्यासोबतच करिअर म्हणून जोपासलेल्या फ्रिस्टाइल फुटबॉल या खेळाचा सराव व नवनवीन तंत्रे आत्मसात करत आहे. या सरावादरम्यान त्याला आई प्रतिभा भोपळे, वडील अशोक भोपळे, मोठा भाऊ अजिंक्य भोपळे, मामा सुधीर चिकोडे, तसेच वडणगे फुटबॉल क्लबचे अध्यक्ष रविराज मोरे, प्रविण जाधव, सर्व खेळाडू, क्रिडा शिक्षक रघुनाथ पाटील, रगेडियन जिमचे फिटनेस कोच विनायक सुतार, अभिजित पाटील, ऋषिकेश ठमके यांचे मार्गदर्शन लाभले.

गुढग्यावर सर्वाधिक वेळ फुटबॉल बॅलन्स विक्रम : प्रणव भोपळे याने यापूर्वी सर्वात पहिला गुडघ्यावर जास्तीत जास्त वेळ फुटबॉल बॅलन्स करण्याचा विक्रम केला होता. त्याने 4 मिनिट 27 सेकंद इतका वेळ फुटबॉल आपल्या गुडघ्या बॅलन्स केला होता. दोन वर्षांपूर्वी त्याने हा विक्रम केला होता. त्याला तात्काळ मान्यता मिळाली आणि त्याचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा नाव नोंदविण्यात आले होते. प्रणवने एक मिनिटात 81 वेळा नाकावर आणि कपाळावर फुटबॉल बॅलन्स केला होता. हा त्याचा जगातील दुसरा विक्रम होता.

प्रणवचा दुसरा विश्वविक्रम : नाक आणि कपाळावर फुटबॉल बॅलन्स करण्याचा हा आगळा वेगळा विक्रम यापूर्वी कोणीही केला नाही. प्रणवने स्वतः हा विक्रम सेट केला आहे. 10 ऑगस्ट 2020 रोजी त्याने हा विक्रम केला आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याच्या या विक्रमाची नोंद झाली आहे. त्यांच्याकडून त्याला तसे प्रमाणपत्र प्राप्त झाले होते. कागदपत्रांच्या पुर्ततेनंतर आणि संपूर्ण पडताळणीनंतर विक्रमाची नोंद करण्यात येते. त्यानुसार त्याच्या या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. आता प्रणवच्या नावे एकूण तीन विश्वविक्रमाची नोंद झाली आहे.

हेही वाचा: Kolhapur Love Story वयाच्या सत्तरीत जुळले मन अन् थाटात झालं लग्न शिरोळ तालुक्यातील प्रेम कहाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.