ETV Bharat / state

कॅफेमध्ये सुरू असलेल्या पार्टीवर पोलिसांचा छापा; शंभरहून अधिक तरुण तरुणी ताब्यात - क्रिसमस

Kolhapur Cafe Raid : ख्रिसमस (Christmas) आणि नवीन वर्षानिमित्त (New Year Party) सुरू असलेल्या पार्टीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला आहे. यात शंभरहून अधिक तरुण-तरुणींना ताब्यात घेतलं आहे.

Kolhapur Cafe Raid
पार्टीवर पोलिसांचा छापा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 26, 2023, 5:54 PM IST

Updated : Dec 26, 2023, 7:53 PM IST

कोल्हापूर Kolhapur Cafe Raid : कोल्हापुरातील उजळाईवाडी येथे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गानजीक असलेल्या एका कॅफेमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकत शंभरहून अधिक तरुण-तरुणींना ताब्यात घेतलं आहे. ही करवाई रविवारी रात्री करण्यात आली. या कारवाईत मद्यसाठ्यासह एकूण २ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

कॅफेमध्ये पोलिसांचा छापा : मिळालेली माहिती अशी की, कोल्हापुरातील उजळाईवाडी परिसरातील एका कॅफेमध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी (New Year Party) बेकायदेशीरपणे पार्टीचे आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये शंभरहून अधिक पुरुष आणि महिला सहभागी झाल्या होत्या. कॅफेमध्ये सुरू असलेल्या कर्णकर्कश आवाजात मद्यपान करत तरुणाई थिरकत होती. तर यामुळं आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना त्रास होत होता. दरम्यान या घटनेची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना समजली आणि त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करून या पार्टीवर छापा टाकला.

गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : पार्टीमध्ये 60 पुरुष आणि 40 हून अधिक महिलांचा सहभाग होता. याप्रकरणी कॅफेचा मालक दयानंद जयंत साळुंखे, पार्टी आयोजक मयुरा राजकुमार चुटानी, डीजे ऑपरेटर गणेश लहू खरात, मालक दिगंबर रघुनाथ सुतार यांच्यासह कामगारांवर पोलिसांनी कारवाई करत, गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात (Gokul Shirgaon Police Station) गुन्हा दाखल केला आहे. तर कॅफेमधून 53 हजार 725 रुपये किंमतीचा विदेशी मध्य, 88 हजार 740 रुपये रोख रक्कम आणि एक लाख 40 हजार रुपये किंमतीचा डीजे सिस्टीम असं एकूण 2 लाख 82 हजार 465 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

यांनी केली कारवाई : सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा.पोलिस निरीक्षक सागर वाघ, सहा.फौजदार हरीश पाटील, खंडेराव कोळी, विलास किरोळकर, अमित सरजे, सचिन पाटील, संतोष पाटील, युवराज पाटील, प्रवीण पाटील, अमर अडूर्कर, सतीश पोवार, रणजित कांबळे, समीर कांबळे, सोम राज पाटील यांनी केली आहे.

हेही वाचा -

  1. पुण्यात फॉर्म हाऊसवर सुरू असलेल्या पार्टीवर पोलिसांचा छापा, पाच मुलींची सुटका तर नऊ आरोपी अटकेत
  2. हुक्का पार्टीवर पोलिसांचा छापा... तिघे ताब्यात तर अन्य फरार!
  3. दिल्लीत रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा; ९० दारू बाटल्यासह ५ लाखाची रोकड आणि ड्रग्जच्या गोळ्या जप्त

Last Updated : Dec 26, 2023, 7:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.