ETV Bharat / state

Stone throwing : सोनाळी गावात झालेल्या दगडफेकीत 3 पोलीस अधिकाऱ्यांसह 5 कर्मचारी जखमी; 'हे' आहे कारण

खुनाच्या प्रकरणातील संशयित आरोपीच्या नातेवाईकांना गावाबाहेर काढावे, या मागणीसाठी निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केल्याने झालेल्या दगडफेकीत अनेकजण जखमी झाले. ( Ijured in Stone Throwing Sonali ) कागल तालुक्यातील सोनाळी गावात काल बुधवारी 22 मार्च रोजी ही घटना घडली. सोनाळी गावातील वरद रवींद्र पाटील या चिमुकल्याचा ऑगस्ट 2021 मध्ये खून झाला होता.

injured police
जखमी पोलीस
author img

By

Published : Mar 23, 2022, 12:15 PM IST

कोल्हापूर - खुनाच्या प्रकरणातील संशयित आरोपीच्या नातेवाईकांना गावाबाहेर काढावे, या मागणीसाठी निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी थांबविण्याचा प्रयत्न केल्याने झालेल्या दगडफेकीत अनेकजण जखमी झाले. ( Ijured in Stone Throwing Sonali ) यामध्ये 3 पोलीस अधिकारी 5 पोलीस कर्मचारी तसेच 5 ग्रामस्थांचा समावेश आहे. कागल तालुक्यातील सोनाळी गावात काल बुधवारी 22 मार्च रोजी ही घटना घडली. सोनाळी गावातील वरद रवींद्र पाटील या चिमुकल्याचा ऑगस्ट 2021 मध्ये खून झाला होता. यामध्ये गावातीलच एकाचा यामध्ये हात असल्याचे समोर आले. त्यामुळे त्याच्या विरोधात अनेक गावकरी एकत्र आले असुन संबंधित संशयिताच्या कुटुंबियांना गावाबाहेर काढावे यामागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता.

काय आहे प्रकरण?

कागल तालुक्यातील सोनाळी गावातील 7 वर्षीय वरद पाटील यांचे ऑगस्ट 2021 मध्ये अपहरण करून सावर्डे बुद्रुक येथे त्याची अमानुष हत्या करण्यात आली होती. गावातीलच मारुती वैद्य नावाच्या 40 वर्षीय व्यक्तीने ही हत्या केल्याचे तपासात समोर आले. दरम्यान, त्यांच्याविरोधात तेंव्हापासूनच गावकरी आक्रमक असून संशयित आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी करत आहेत. दरम्यान, याच संशयित आरोपीच्या नातेवाईकांना सुद्धा गावातून बाहेर काढावे या मागणीसाठी निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी रोखल्याने हिंसक वळण लागले.

हेही वाचा - The Longest Tunnel : सर्वांत लांब बोगदा; पनवेल-कर्जत मार्गावर २.६० किमी लांबीचा असणार बोगदा

संतापलेल्या नागरिकांनी दगडफेक सुरू केली यामध्ये 3 पोलीस अधिकारी तसेच 5 कोल्हापूर कर्मचारी आणि 5 ग्रामस्थ जखमी झाले आहेत. पोलीस उपनिरीक्षक मोनिका खडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे आणि सहाय्यक पोलीस उप निरीक्षक विकास ढेरे अशी या तीन जखमी अधिकाऱ्यांची नावे आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.