ETV Bharat / state

ST Gang Leader Sanjay Telnade Arrested : कुख्यात भूखंड माफिया एस. टी. गँगचा प्रमुख संजय तेलनाडेच्या मुसक्या आवळल्या - कुख्यात भूखंड माफिया संजय तेलनाडे अटक

कुख्यात भूखंड माफिया एस. टी. गँगचा प्रमुख संजय शंकरराव तेलनाडे याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. ही कारवाई कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुणे येथील आंबेवाडी येथे केली.

Plot mafia ST Gang leader Sanjay Telnade Arrested by Kolhapur Police
कुख्यात भूखंड माफिया एस. टी. गँगचा प्रमुख संजय तेलनाडेच्या मुसक्या आवळल्या
author img

By

Published : Jan 1, 2022, 11:37 PM IST

Updated : Jan 2, 2022, 2:54 PM IST

कोल्हापूर - जिल्ह्यासह इचलकरंजी तालुक्यात मध्यस्थीच्या नावाखाली खंडणी वसुली करणाऱ्या आणि बेकायदेशीर सावकारीने मिळकती गिळकृंत करणाऱ्या इचलकरंजी येथील कुख्यात भूखंड माफिया एस. टी. गँगचा प्रमुख संजय शंकरराव तेलनाडे ( ST Gang Leader Sanjay Telnade ) याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. ही कारवाई कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पुणे येथील आंबेवाडी येथे केली. संजय तेलनाडे 2019 पासून फरार होता. त्याच्यावर मोक्कासह अनेक कलमांअंतर्गत विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. ( Kolhapur SP Shailesh Balkawade ) ते शनिवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. ( Plot mafia ST Gang leader Sanjay Telnade Arrested by Kolhapur Police )

कुख्यात भूखंड माफिया एस. टी. गँगचा प्रमुख संजय तेलनाडेच्या मुसक्या आवळल्या

मोक्कासह अनेक गुन्हे दाखल -

तेलनाडे याच्यावर खून, फसवणूक सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला अशा प्रकारचे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांच्यावर पोलीस अधीक्षक यांच्या सुचनेनुसार इचलकरंजी नगरपालिकेचा माजी नगरसेवक असणाऱ्या माजी नगरसेवक संजय तेलनाडे व त्याचा भाऊ सुनिल तेलनाडे याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. मात्र, 2019पासून तेलनाडे बंधू फरार होते. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, उत्कर्ष वझे यांचे विशेष पथक तयार करून तेलनाडे बंधुचा शोध सुरू केला.

पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांना मिळालेल्या माहितीनुसार, तेलनाडे बंधु पुण्यातील आंबेवाडी येथे वास्तव्यास असल्याची खात्री झाली. त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने याठिकाणी सापळा रचून नगरसेवक संजय तेलनाडेच्या मुसक्या आवळल्या आहेत. तत्कालीन डीवायएसपी गणेश बिरादार यांनी इचलकरंजी शहरातील सरकारच्या पोळीचा बीमोड केला होता. त्यांच्या सर्व आरोपींना गजाआड केले होते. हे दोन बंधुराज मात्र फरार होते. सुमारे 214 आरोपींना मोक्का कायद्यांतर्गत गजाआड केले होते. मात्र, आज नगरसेवक संजय तेलनाडे याला आज गजाड केल्यामुळे सर्व स्तरांतून कौतुक होऊ लागले आहे.

हेही वाचा - New Marriage Bill 2021 : विचार मंथन : विवाहाचे वय नेमके किती असावे?

या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, उत्कर्ष वझे यांच्यासह रणजीत पाटील, संजय इंगवले, अमर शिरढोण, श्रीकांत मोहिते, रणजीत कांबळे, प्रशांत कांबळे, सुरज चव्हाण, उत्तम सडोलीकर आणि महादेव कुऱ्हाडे यांनी ही कामगिरी यशस्वी केली.

Last Updated : Jan 2, 2022, 2:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.